Zodiac Signs: माणसांच्या आयुष्यात जर भेटलं, त्याच्याबरोबर बोलणं झालं की, एक गोष्ट कायम वाटतं हा माणसं चांगला आहे. तर कधी कधी काही वेळा एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्याचे विचार बघून, त्याचे बोलणं ऐकून वाटतं की, हा माणूस आपल्याला जीवनसाथी (Life Partner) म्हणून मिळायला हवा. त्यानंतर सुरु होतो त्या-त्या व्यक्तींच भेटणं बोलणं सुरु होतं. तर काही माणसं पहिल्या भेटीतच एकदम चांगले एकमेकांचे चांगले मित्र (Best friends of each other) बनतात. तर काही लोकांबरोबर आयुष्यभर राहूनही त्यांचे एकमेकांचे विचार कधीच एकमेकांबरोबर जुळत नाहीत.
ADVERTISEMENT
त्यानंतर एक काळ येतो की, त्यांच्या आयुष्यात फक्त वाद आणि विवादच तेवढे शिल्लक राहतात. ज्योतिषशास्त्राच्या (Astrology) अनुमानानुसार काही राशीच्या व्यक्ती या एकमेकांबरोबर एकदम मिळत्याजुळत्या असतात. तर काही राशीच्या व्यक्ती एक दुसऱ्याबरोबर राहूही शकत नाहीत. तर आम्ही तुम्हाला अशा काही राशीच्या माणसांच्या गोष्टी सांगणार आहे, कोण-कोणत्या राशी या एकमेकांच्या जीवनसाथी बनू शकत नाहीत.
हे ही वाचा >> पालघर: पत्नी पतीला निरोप द्यायला गेली अन् काळाने साधला डाव; चिमुकलीचा करुण अंत
मकर आणि मेष
मकर राशीचे लोकांचे विचार आणि त्यांची जीवनशैली ही चांगली असते. मात्र त्यांचे आणि मेष राशीच्या लोकांबरोबर त्यांचे विचार अजिबात एकमेकांबरोबर जुळत नाहीत. मेष राशीच्या संयमी स्वभावामुळे मकर राशीचे लोक त्यांच्यावर वैतागलेले असतात. त्यामुळे ते प्रचंड ताणतणावात राहत असतात.
कुंभ आणि वृषभ
कुंभ राशीचे लोकं ही प्रचंड जिद्दी आणि स्वतंत्र विचाराची असतात. त्यामुळे त्यांचे विचार वृषभ राशीच्या लोकांबरोबर सूर मिळून येत नाही. जर कुंभ आणि वृषभ राशीच्या लोकांची जोडी निर्माण झाली तर मात्र त्यांच्यामध्ये फक्त वाद विवादच होतील. छोट्या छोट्या गोष्टीवरुन वाद होतील. वृषभ राशीच्या लोकांना कुंभ राशीच्या लोकांचे स्वतंत्र विचार अजिबात पसंद नसतात. त्यामुळे त्यांचे वाद टोकाला गेलेले असतात.
मीन आणि मिथुन
मीन राशीची माणसं ही सरळ स्वभावाची असतात, त्यामुळे त्यांचे विचार कधी मिथुन राशीबरोबर जुळून येत नाहीत. मिथुन राशीची लोकं फक्त आपला स्वतःचाच विचार करत असतात. तर मीन राशीचे लोक याविरुद्ध असतात. ते नेहमी इतर लोकांचा, दुसऱ्या लोकांच्या मनांचा आणि भावनांचा विचार करतात. त्यामुळेच मीन राशीची माणसं ही नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. त्यामुळे या दोन राशींच्या लोकांचे विचार हे दोन टोकाचे असतात. त्यामुळे या दोन राशीची माणसं चांगलेपणाने कधीही एकत्र राहू शकत नाहीत.
मेष आणि कर्क
मेष राशीचे लोक अगदी बिनधास्त आणि धडाकेबाज असतात. जेव्हा या राशीची माणसं चांगल्या लोकांबरोबर नातेसंबंध जुळवतात. तेव्हा त्यांना फक्त समस्याच समस्या येत असतात. तर कर्क राशीचे लोक मात्र काळजी घेणारे आणि चांगला विचार करणारे असतात. त्यांच्या या विरुद्ध स्वभावामुळेच त्यांना एकमेकांसोबत राहण्यात खूप अडचणी येतात. मेष राशीचे लोक ज्या प्रमाणे सहजपणे व्यक्त होतात, त्यापेक्षा अधिक मेष राशीचे लोक अंतर्मुखी असतात.
वृषभ आणि सिंह
वृषभ आणि सिंह या दोन्ही राशीची लोकं ही स्वभावाने हट्टी असतात. सिंह राशीची लोकं फक्त स्वत:बद्दलच विचार करतात, त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना त्यांचा हा विचार पटत नसतो. तर सिंह राशीच्या लोकांना नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडते. तर वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्याच जगात मग्न राहायचे असते. या दोन्ही विरुद्ध टोकाच्या विचारामुळेच त्या दोघांमध्ये सातत्याने भांडणं होत असतात.
हे ही वाचा >> मुंबई लोकलमध्ये ‘दे दणा दण’! गळा पकडला अन्…; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
मिथुन आणि कन्या
मिथुन राशीची लोकं नेहमीच उत्साही आणि जिज्ञासू स्वभावाची असतात. त्यांना व्यावहारिक कन्या राशीचे लोक नेहमीच कंटाळवाणे वाटतात. मिथुन राशीची लोक मौजमजा आणि प्रेमावर अधिक विश्वास ठेवत असतात. तर कन्या राशीची लोकं त्यांच्या कामाला प्रथम प्राधान्य देतात. मिथुन राशीच्या लोकांच्या मनात कधीच संकोच न करता. ती प्रेमानं वागत असतात. तर याविरुद्ध कन्या राशीची लोकं आहेत, म्हणजेच ती अगदीच संकुचित वृत्ती असल्यासारखे राहतात. त्यामुळे दोघांच्या स्वभावात मिळतं जुळतं राहणं कठीण होतं.
ADVERTISEMENT