Mazi Ladki Bahin Yojana Rules : देशातील नागरिकांसाठी भारत सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. लोकांच्या गरजा समजून विविध योजना सुरु केल्या जातात. देशातील कोटयावधी लोकांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळतो. केंद्र सरकारच नाही, तर देशातील वेगवेगळ्या राज्यातील सरकारेही नागरिकांसाठी विविध योजना सुरु करतात. यामध्ये सर्वाधिक योजना ह्या गरिब लोकांसाठी असतात.
ADVERTISEMENT
सरकारकडून महिलांसाठीही अनेक प्रकारच्या योजना सुरु केल्या जातात. यावर्षी राज्य सरकारकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आलीय. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. परंतु, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकराने काही नियमावली जाहीर केली आहे. ज्या महिला सरकारने दिलेल्या अटी पूर्ण करणार नाहीत, त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. या योजनेचे नेमके नियम कोणते आहेत, हे जाणून घेऊयात.
'या' महिलांना मिळणार नाहीत पैसे
माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने काही नियम आणि पात्रतेचे निकष जाहीर केले आहेत. ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महिला किंवा कुटुंबातील एखादा सदस्य कर भरत असेल किंवा भारत सरकारच्या एखाद्या शासकीय विभागात नोकरी करत असेल, तर त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. स्वत: महिला किंवा कुटुंबातील सदस्य एखाद्या सरकारी योजनेतून प्रत्येक महिन्याला 1250 रुपयांचा लाभ घेत असेल, तर त्या कुटुंबातील महिलाही या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
हे ही वाचा >> Ravindra Dhangekar Tweet: रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसची पहिली यादी फोडली! विधानसभेसाठी कुणाला मिळाली संधी?
महिला किंवा तिच्या कुटुंबातील एखादा सदस्य भारत किंवा राज्य सरकारच्या एखाद्या बोर्ड, निगम, मंडलाचा अध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असेल, तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसचं कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर ट्रॅक्टर व्यतिरिक्त चारचाकी वाहन असेल, महिला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल, तर अशा महिलाही या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
असं करा अर्ज
राज्यात अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अर्ज केला नाही. आता एखाद्या महिलेला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर ती महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकते. माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालये, अंगणवाडी सेविका, तसच सेतू कार्यलयात अर्ज जमा केला जाऊ शकतो. या योजनेसाठी सरकारने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नारी शक्ती अॅप जारी केला आहे. जे तुम्ही गुगल प्ले स्टोर आणि अॅप स्टोरमधून डाऊनलोड करू शकता.
ADVERTISEMENT