Z+ Security म्हणजे काय आणि ती कोणाला दिली जाते?

रोहिणी ठोंबरे

• 10:38 AM • 29 Dec 2023

झेड प्लस (Z+ Security) स्तरावरील सुरक्षा अशा महत्त्वाच्या लोकांना दिली जाते जे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत किंवा ज्यांना धोका आहे. ज्यांच्या जाण्याने कोणत्याही क्षेत्रात मोठे नुकसान होऊ शकते त्यांना ही ही सुरक्षा दिली जाते.

What is Z+ Security and who gets this type of Security

What is Z+ Security and who gets this type of Security

follow google news

What is Z+ Security? : झेड प्लस (Z+ Security) स्तरावरील सुरक्षा अशा महत्त्वाच्या लोकांना दिली जाते जे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत किंवा ज्यांना धोका आहे. ज्यांच्या जाण्याने कोणत्याही क्षेत्रात मोठे नुकसान होऊ शकते त्यांना ही ही सुरक्षा दिली जाते. (What is Z+ Security and who gets this type of Security)

हे वाचलं का?

Z+ सुरक्षेचा नेमका अर्थ काय?

Z+ सुरक्षे अंतर्गत व्हीव्हीआयपींच्या (VVIP) आसपास 58 सैनिक सुरक्षेसाठी तैनात केले जातात. पाच किंवा त्याहून अधिक बुलेटप्रूफ गाड्याही पुरवल्या जातात. 10 NSG किंवा सशस्त्र स्टॅटिक गार्ड असतात. 15 पोलीस कमांडो, 6 PSO, 24 सैनिक, 5 वॉचर्स आणि एक इन्स्पेक्टर किंवा सबइन्स्पेक्टर प्रभारी असतात. व्हीव्हीआयपींच्या घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी सहा सैनिक आणि सहा प्रशिक्षित ड्रायव्हरही असतात.

वाचा : Maratha Reservation: जरांगे पाटलांचं ठरलं म्हणाले, ‘…तर आम्ही फडणवीसांच्या घरात जाऊन बसू’

Z कॅटेगरी सुरक्षा म्हणजे काय?

झेड कॅटेगरीच्या सुरक्षेत 22 सुरक्षा कर्मचारी असतात. तसंच 4 ते 6 NSG कमांडो असतात. पोलीस किंवा सीआरपीएफचे जवानही तिथे असतात.

Y+ कॅटेगरी सुरक्षा म्हणजे काय?

Y+ कॅटेगरी सुरक्षा हे अतिशय महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे. 11 सुरक्षा कर्मचार्‍यांसह, त्यात एक एस्कॉर्ट वाहन देखील असते. निवासस्थानी एक गार्ड कमांडर आणि चार रक्षकही तैनात केले जातात.

वाचा : Shiv Sena UBT: ‘त्या एका जिद्दीने मी उभा आहे…’, उद्धव ठाकरेंनी थेट मोदींनाच दिलं चॅलेंज!

Y कॅटेगरी सुरक्षा म्हणजे काय?

Y कॅटेगरीत 11 सैनिक तैनात असतात. एक-दोन कमांडो आणि दोन पीएसओही तिथेच असतात.

एक्स लेव्हल सुरक्षा म्हणजे काय?

त्यात दोन सुरक्षा कर्मचारी असतात. एक वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) असतो.

SPG सुरक्षा म्हणजे काय?

SPG सुरक्षा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यातील कमांडों किंवा सैनिकांची संख्या उघड करण्यात आलेली नाही. असे मानले जाते की, 24 ते 30 कमांडो नेहमीच पंतप्रधानांच्या संरक्षणासाठी असतात.

व्हीआयपी सुरक्षा कोणत्या आधारावर उपलब्ध आहे? ती कोणाला मिळते?

सुरक्षा कोणाला मिळणार?, कोणाला नाही? याचा निर्णय राज्य सरकार घेते. जर कोणाला दहशतवादी, अतिरेक्यांकडून किंवा माफिया आणि गुंडांकडून जीवाला धोका असल्यास ही सुरक्षा पुरवली जाते. धोक्याच्या आधारावर, सुरक्षा वाढवली जाते किंवा कमी केली जाते किंवा मागे घेतली जाते. हे काम सुरक्षा तज्ज्ञांच्या दोन समित्या करतात.

वाचा : Lok Sabha 2024 : मुंबईतील तीन जागांवर डोळा, काँग्रेसच्या मनात काय?

केंद्र सरकार कोणत्या VVIP ना सुरक्षा पुरवते?

केंद्र सरकार पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशा सरकारी पदांवर नियुक्त केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवते. केंद्र सरकारने सुरक्षेच्या पाच श्रेणी तयार केल्या आहेत. यामध्ये X, Y, Y+, Z आणि Z+ समाविष्ट आहे.

देशात किती लोकांना सुरक्षा मिळाली?

गेल्या वर्षी 9 मार्च रोजी गृह राज्यमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले होते की 230 लोक आहेत ज्यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवत आहे. तर राज्य सरकार 19 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षा पुरवते.

    follow whatsapp