Alexa, Siri, Google Map अशा सगळ्याच ठिकाणी महिलांचाच आवाज का? 'हे' आहे खरं कारण...

तुम्ही कधी हा विचार केला का, की जवळपास सगळ्याच व्हर्च्युअल असिस्टंटमध्ये (सिरी, गुगल असिस्टंट, अलेक्सा) फक्त महिलांचाच आवाज का वापरला जातो? असं काय कारण आहे की व्हार्च्युअल जगात तुमच्या संवाद साधण्यासाठी वापरलेले आवाज फक्त महिलांचेच आवाज का आहेत?

Mumbai Tak

मुंबई तक

24 Dec 2024 (अपडेटेड: 24 Dec 2024, 05:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वेगवेगळ्या Application मध्ये महिलांचेच आवाज का वापरतात?

point

फक्त मार्केटींगचे फंडे की अजून काही...


तुमच्या कारमध्ये जीपीएस सिस्टीम तुम्हाला मार्ग सांगत असतं तेव्हा त्यातून महिलेचाच आवाज येतो. तुमच्या फोनमधील अलेक्सा किंवा सिरी सुद्धा तुम्हाला रिस्पॉन्स करतात, तेव्हा तुम्हाला महिलेच्याच आवाजात उत्तर मिळतं. पण तुम्ही कधी हा विचार केला का, की जवळपास सगळ्याच व्हर्च्युअल असिस्टंटमध्ये (सिरी, गुगल असिस्टंट, अलेक्सा) फक्त महिलांचाच आवाज का वापरला जातो? असं काय कारण आहे की व्हार्च्युअल जगात तुमच्या संवाद साधण्यासाठी वापरलेले आवाज फक्त महिलांचेच आवाज का आहेत. तर हा फक्त योगायोग नाही. तर त्यामागे काही वैज्ञानिक, सामाजिक आणि मानसिक कारणं आहेत.

हे वाचलं का?


वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, माणूस महिलेच्या आवाजाला प्राधान्य देतो. काही लोकांचा असाही विश्वास आहे की, हे प्राधान्य आपल्या गर्भाच्या अवस्थेपासून सुरू होतं. कारण गर्भाशयात स्त्रीचाच आवाज आपल्याला शांत करतो. तर इतर संशोधनात असं आढळून आलं की स्त्रिया स्वर आणि ध्वनी अधिक स्पष्टपणे उच्चारतात. त्यामुळे तो आवाज समजण्यास सोपा जातो. दुस-या महायुद्धात विमानांच्या कॉकपिटमध्येही महिलांचा आवाज वापरला जात होता, कारण त्यांचा आवाज पुरुष वैमानिकांपेक्षा मोठा होता. त्यामुळे तो सहज ओळखता येत होता. फक्त आता व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर नाही, तर सामान्य जगातही महिलांच्या आवाजाला वर्षानुवर्षे महत्त्व दिलं जात आहे. 1880 पर्यंत टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम फक्त महिलांना दिलं जात होत.

हे ही वाचा >> Suresh Dhas : "मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणीही बीडचं पालकमंत्रिपद...."; सुरेश धस यांचा मुंडेंना थेट विरोध?


स्त्रिया सहसा समाजात आश्वासक आणि सहानुभूतीच्या भूमिकेत दिसतात. असाच समज बराच काळ समाजात रुजला आहे. अनेक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी ही हे स्वीकारलं आहे. वेगवेगळ्या संशोधनांमध्येही असं दिसून आलंय,  की सामान्यत: महिलांच्या आवाजात मऊ आणि सुखदायक असतो. त्यामुळे तो ऐकणाऱ्यांना आरामदायी वाटतो. 

एकूणच या सर्व कारणांमुळेच कंपन्यांना त्यांचे व्हर्च्युअल असीस्टंट जास्तीत जास्त लोकांनी वापरावेत असं वाटतं. त्यामुळे त्यांनी महिला आवाजाला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्त ग्राहकांशी अधिक जोडले जाऊ शकतात.

 

हे ही वाचा >> Mobile Recharge Plans Price : Jio, Airtel VI चे रिचार्ज प्लॅन स्वस्त होणार? TRAI चे कंपन्यांना आदेश


काही कंपन्या आता वापरकर्त्यांना व्हर्च्युअल असिस्टंटसाठी आवाज निवडण्याचा पर्याय देतात. मेल व्हाईस आणि फिमेल व्हाईस असे दोन पर्याय मिळतात. उदाहरणार्थ, Google Assistant आणि Siri मध्ये आपण आवाज बदलू शकतो. 

    follow whatsapp