Relationship Tips: कोणतंही नातं दीर्घकाळ टिकवण्यासाठी ज्या गोष्टींची सर्वाधिक गरज असते ती म्हणजे प्रेम आणि विश्वास. जेव्हा पती-पत्नी (Husband-Wife) एकमेकांचा आदर करतात. जेव्हा त्यांना एकमेकांसोबत सुरक्षित वाटत असतं तेव्हा मात्र त्या दोघांमध्ये कोणतीही तिसरी व्यक्ती येणं शक्य नसतं. तर ज्या जोडप्यांमध्ये (Couple) आदर केला जात नाही, अशा जोडप्यांना एकत्र वेळ घालवणं त्यांच्यासाठी कठीण असते. त्यामुळे दोघांमधील नातं कसं असावं, ते कसं निभावावं हे त्या दोघांवरच अवलंबून असते. कारण आताचा काळ पूर्वीसारखा राहिला नाही.
ADVERTISEMENT
समज-गैरसमज
आजच्या काळात विवाहित स्त्री असो किंवा पुरुष, दोघांनाही कामाच्या बाबतीत इतर लोकांबरोबर बोलावे लागत असते. बोलावे लागत असले तरी हा संवाद वेगळ्या आदरयुक्त असाच असतो. कारण विवाहित असताना दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषाशी प्रेमाने बोलणे यामध्ये काहीच गैर नाही. मात्र एखादा पुरुष दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात फार पटकन पडत असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला त्या विवाहित पुरुषांच्या सवयींबद्दल सांगणार आहोत. जे आपल्या पत्नीला सर्वस्व मानतात पण इतर महिलांसोबत ते चुकीचे अजिबात वागत नाहीत.
सिक्रेट गोष्टी
कोणताही चांगला विवाहित पुरुष कधीही आपल्या पत्नीशी खोटं बोलत नाही किंवा तो तिच्यापासून काहीही लपवतही नाही. कारण त्याची मैत्रीण कितीही चांगली असली तरी त्याला त्याचा मित्र आणि बायको या दोघांमधील फरक कळत असतो. जीवनात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे आणि वैवाहिक नाते कसं जोपासायचे हे त्याला चांगलेच माहिती असते.
हे ही वाचा >> सुट्टीत थंड ठिकाणी जाण्याचा करताय प्लान? मग, फॉलो करा ‘या’ Skin Care टिप्स!
वैयक्तिक बाबी मर्यादित ठेवा
लग्न म्हटले की चढ-उतार हे ठरलेले असताताच. त्यामुळे विवाहानंतर हे नातं कधी कधी खूप चांगले असते तर कधी कधी काही गोष्टीमुळे वादही होत असतात. मात्र हे वाद कायमच असतील असं नसते. त्यामुळे दोघांमधील वैयक्तिक गोष्टी या पूर्णपणे अगदीच खासगी ठेवल्या जातात. या गोष्टी चांगली माणसंच करत असतात. कारण तुमच्या वैवाहिक आयुष्यातील काही गोष्टी दुसऱ्या स्त्री बरोबर शेअर केल्यामुळे त्यातून गैरसमजही होऊ शकतात. तसेच तुमचे नाते आधीपेक्षाही अधिक खराब होऊ शकते.
तणाव घरी आणत नाही
बाहेरील कोणताही ताणतणाव तुम्ही घरी सांगत असाल, त्या शेअर करत असाल तर त्यात काहीही वावगं नाही. कारण तुमच्या ऑफिसमध्ये एकदा दिवस बरा वाईट गेला, तुम्हाला कधी थकवा जाणवला आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्या पत्नीऐवजी दुसऱ्या महिलेला सांगत असाल तर ते योग्यच नाही. कारण एकाद्या महिलेसोबत जास्त वेळ घालवमुळे त्याचा तुमच्या नातेसंबंधांवर वाईट परिणाम होत असतो. तुमच्या दोघांमधील जवळीकता अशा गोष्टीमुळे कमी होत असते. कारण कालांतराने तुमच्या वैवाहिक आयुष्यावरच नव्हे तर तुमच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
नात्यात शांतता हवी
जे लोक आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात त्यांना फक्त प्रेम आणि शांती हवी असते यामध्ये कोणतीच शंका नाही. तो आपल्या जोडीदाराशी घट्ट नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी केवळ त्याच्या वैवाहिक जीवनाच्या भावनिकतेचाच आदर करतात.
ADVERTISEMENT