Upendra Singh Rawat : भाजप खासदाराचा महिलेसोबतचा कथित व्हिडीओ व्हायरल

भागवत हिरेकर

• 10:40 AM • 04 Mar 2024

Upendra Singh Rawat Viral Video : भाजपचे बाराबंकी लोकसभा मतदारसंघाचे खासदार उमेंद्र सिंह रावत यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

भाजपचे खासदार उपेंद्र सिंह रावत यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

upendra singh rawat video goes viral

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजप खासदाराचा कथित व्हिडीओ व्हायरल

point

उपेंद्र सिंह रावत व्हायरल व्हिडीओबद्दल काय म्हणाले?

point

व्हायरल व्हिडीओनंतर काँग्रेसने घेरले

Lok Sabha Election 2024 साठी भाजपने बाराबंकीमधून उपेंद्र सिंह रावत यांना तिकीट दिले आहे. यानंतर लगेचच काँग्रेसने त्यांचा कथित व्हायरल व्हिडिओ वरून घेरलं आहे... 

हे वाचलं का?

Upendra Singh Rawat Viral Video : भाजपने ज्यांना पुन्हा लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले, ते विद्ममान खासदार उपेंद्र सिंह रावत वादात सापडले आहेत. एक कथित व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक विदेशी महिला आणि रावत दिसत आहे. काँग्रेसने याचं व्हिडीओवरून आता भाजपला घेरलं आहे. 

उत्तर प्रदेशचे बाराबंकीचे खासदार उपेंद्र सिंह रावत यांचा एका विदेशी महिलेसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने या जागेवरून पुन्हा एकदा रावत यांना तिकीट दिले आहे. 

तिकिटाची घोषणा झाल्यापासून रावत यांचा हा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर काँग्रेसनेही प्रश्न उपस्थित केले आहेत.

रावत यांनी पोलिसांत केली तक्रार

उपेंद्र सिंह रावत यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ AI ने बनवण्यात आला असून हा व्हिडीओ एडिट करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. 

व्हिडीओ व्हायरल करून आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा >> "विचार करून बोला", निवडणुकीआधी मोदींचा मंत्र्यांना स्पष्ट 'मेसेज'

याप्रकरणी पोलिसांनी निष्पक्ष तपास करण्याची मागणी रावत यांनी केली आहे. या व्हिडीओमध्ये परदेशी महिलेसोबत जो व्यक्ती दिसत आहे, तो मी नसून माझा चेहरा एआयच्या माध्यमातून वापरण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

त्यांनी असंही म्हटले आहे की, हे व्हिडिओ 2022 आणि 2023 चे आहेत.

भाजपच्या पहिल्याच यादीत रावत यांचं नाव

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 2 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत १९५ उमेदवारांची नावे आहेत. याच यादीत भाजपने बाराबंकीमधून उपेंद्र सिंह रावत यांच्या नावाची घोषणा केली. 

भाजपने रावत यांना त्यांच्या जुन्या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या नावाची घोषणा होताच काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. 

हेही वाचा >> भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचं नाव का नाही?

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांनी सोशल मीडिया एक्स (ट्विटर) वर याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, "नड्डा जी, बाराबंकीचे भाजप खासदार उपेंद्र रावत यांना त्यांची 'व्हायरल प्रतिभा' पाहून पुन्हा लोकसभेचे तिकीट देण्यात आले? सीव्हीसोबत सीडीही दिसली होती का?"

2019 च्या लोकसभा निवडणुकीत उपेंद्र सिंह रावत यांनी बाराबंकी मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या राम सागर रावत यांचा पराभव केला. यापूर्वी 2014 मध्ये भाजपच्या प्रियांका सिंह रावत यांनी येथून निवडणूक जिंकली होती.

    follow whatsapp