Lok Sabha 2024 Maha Vikas Aghadi : लोकसभा निवडणूक जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. यात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन मतदारसंघ सोडायची तयारी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दर्शवली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
ADVERTISEMENT
आतापर्यंत तिन्ही पक्षात ४० जागांवर एकमत झालं असून, उर्वरित ८ मतदारसंघांसह अंतिम निर्णय आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा >> जरांगेंना उमेदवारी देणार का? संजय राऊतांनी दिलं उत्तर
टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने ४० जागांचं वाटप जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं आहे. ८ जागांचा तिढा कायम असून, आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेला १५ जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८ जागा आणि काँग्रेसला १४ जागा यावर एकमत झालं आहे.
Lok Sabha Election 2024 Maharashtra : कोणता मतदारसंघात कुणाकडे?
1) मुंबई उत्तर मध्य- काँग्रेस
2) मुंबई उत्तर -काँग्रेस
3) मुंबई उत्तर पश्चिम -तिढा कायम
4) मुंबई दक्षिण -शिवसेना ठाकरे गट
5) मुंबई ईशान्य -शिवसेना ठाकरे गट
6) मुंबई दक्षिण मध्य – तिढा कायम
7) नांदेड -काँग्रेस
8) लातूर -काँग्रेस
9) हिंगोली – तिढा कायम
10) परभणी -शिवसेना ठाकरे गट
11) जालना -तिढा कायम
12) संभाजीनगर -शिवसेना ठाकरे गट
13) बीड -राष्ट्रवादी
14) नाशिक -शिवसेना ठाकरे गट
15)दिंडोरी -राष्ट्रवादी
16) पालघर -शिवसेना ठाकरे गट
17) कल्याण – शिवसेना ठाकरे गट
18) ठाणे – शिवसेना ठाकरे गट
19) भिवंडी -तिढा कायम
20) रायगड -शिवसेना ठाकरे गट
21)रत्नागिरी सिंधुदुर्ग – शिवसना ठाकरे गट
22) धाराशिव -शिवसेना ठाकरे गट
23) कोल्हापूर – शिवसेना ठाकरे गट
24) हातकणंगले – ( ठाकरे स्वाभिमानी शेतकरी संघटनासाठी सोडू शकतात)
25) अकोला – ( ठाकरे वंचित बहुजन आघाडी साठी सोडणार)
26) पुणे -काँग्रेस
27) सोलापूर – काँग्रेस
28) सांगली -काँग्रेस
29) शिरूर – राष्ट्रवादी
30) सातारा -राष्ट्रवादी
31) माढा- राष्ट्रवादी
32) मावळ -शिवसेना ठाकरे गट
33) बारामती -राष्ट्रवादी
34) जळगाव -राष्ट्रवादी
35) अहमदनगर -राष्ट्रवादी
36) शिर्डी – तिढा कायम
37) वर्धा- तिढा कायम
38) नागपूर -काँग्रेस
39) रामटेक – तिढा कायम
40) बुलढाणा – शिवसेना ठाकरे गट
41) यवतमाळ वाशिम -शिवसेना ठाकरे गट
42) अमरावती -काँग्रेस
43) भंडारा – काँग्रेस
44) चंद्रपूर -काँग्रेस
45) गडचिरोली – काँग्रेस
46) नंदुरबार -काँग्रेस
47) रावेर -राष्ट्रवादी
48) धुळे -काँग्रेस
ADVERTISEMENT