MNS: 'लोकसभा निवडणूक लढवायची की नाही?' राज ठाकरेंच्या मनात नेमकं चाललंय काय?

मिथिलेश गुप्ता

24 Feb 2024 (अपडेटेड: 24 Feb 2024, 07:19 PM)

Raj Thackeray: 2019 लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय हा राज ठाकरेंनी घेतला होता. यंदाही लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत मनसेमध्ये संभ्रम कायम आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही?

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही?

follow google news

बातम्या हायलाइट

point

मनसे लोकसभा निवडणुकीबाबत काय घेणार निर्णय

point

राज ठाकरेंच्या मनात काय?

point

लोकसभेला राज ठाकरे काय भूमिका घेणार?

Raj Thackeray Lok Sabha Election 2024: डोंबिवली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दोन दिवसीय भिवंडी व कल्याण लोकसभा दौरा सुरु आहे. आज त्यांनी कल्याण येथील स्प्रिंग टाईम या हॉटेलमध्ये कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष आदी यांची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणूक लढवायची की नाही? यासंदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (to contest lok sabha elections or not what is really going on in mns chief raj thackeray mind)

हे वाचलं का?

यावेळी निवडणूक लढवायची असा होकार कार्यकर्त्यांनी दिला आहे. येत्या 29 फेब्रुवारी पर्यंत आपापल्या विभागातील पदाधिकाऱ्यांची यादी गोळा करण्याचे सांगत लोकसभा निवडणुकीबाबत आपण तेव्हाच भूमिका स्पष्ट करू असेही या बैठकीत राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे समजते.

राज ठाकरेंच्या मनात काय?

कल्याण लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार आहेत. मात्र इतर पक्ष देखील येथून निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांना शह देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आणि मंत्री असलेले कपिल पाटील निवडणूक लढवणार आहेत.

हे ही वाचा>> MNS: गणपत गायकवाड गोळीबारावर राज ठाकरे 'असं' का बोलले?

याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण दौऱ्याचे आयोजन केले आहे. आज कल्याण येथे त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी का? असा प्रश्न करताच पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवावी असा होकार दिला. 

इतकेच नव्हे तर संघटनात्मक बांधणी करण्याचे कार्यकर्त्यांना त्यांनी आदेश दिले आहेत. पुढील आठवड्यापर्यंत ही बांधणी करण्यासाठी सांगितले असून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू करा असे आदेश त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

    follow whatsapp