Maharashtra Exit Poll : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलने दिलेल्या आकडेवारीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबद्दलचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. मात्र, कोणत्या जागांवर कुणाचा विजय होणार? हे स्पष्ट झालेलं नव्हत. अशातच संभाव्य विजयी उमेदवारांची नावही समोर आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांची नावं आहेत. राज्यात मागच्या काळात झालेल्या राजकिय घडामोडी आणि त्यानंतर झालेल्या पक्षफुटीमुळे राज्यातील अनेक मतदारसंघाचे समीकरण बदलले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Nana Patole: निकालाआधीच मविआत CM पदावरून रस्सीखेच! पटोले म्हणाले, "काँग्रेसचा मुख्यमंत्री..."
प्रजातंत्रच्या मतदारसंघनिहाय एक्झिट पोलनुसार, ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे विजयी होणार आहेत. तर दक्षिण पश्चिम नागपूरमधून भाजपच्या देवेंद्र फडणवीसांना यश मिळणार आहे. तसच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार बाजी मारणार असल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
प्रजातंत्रचा EXIT POLL, मतदारसंघनिहाय एक्झिट पोल
- कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे, शिवसेना
- द.प. नागपूर - देवेंद्र फडणवीस, भाजप
- बारामती - अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
- कामठी - चंद्रशेखर बावनकुळे - भाजप
- रामटेक - अपक्षांमध्ये, चुरशीची लढत
- अहेरी - धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी
- बारामती - अजित पवार
- कामठी - चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
- शिवडी - अजय चौधरी, शिवसेना उद्धव ठाकरे
- पू. औरंगाबाद - इम्तियाज जलील, एमआयएम (चुरशीची लढत)
- सिल्लोड - अब्दुल सत्तार, शिवसेना
- भोकर - श्रीजय चव्हाण, भाजप
- कन्नड - उदयसिंह राजपूर, शिवसेना उद्धव ठाकरे (चुरशीची लढत)
- येवला - छगन भुजबळ, राष्ट्रवादी
- दिंडोरी - सुनीता चारोसकर, राष्ट्रवादी शरद पवार
- बेलापूर - संदीप नाईक, राष्ट्रवादी शरद पवार
- जोगेश्वरी पूर्व - अनंत नर, शिवसेना उद्धव ठाकरे
- मुंबादेवी - अमीन पटेल, काँग्रेस
- वर्सोवा - हारून खान, शिवसेना, उद्धव ठाकरे
- अंधेरी - मुरजी पटेल, भाजप
- महाड - स्नेहल जगताप, शिवसेना उद्धव ठाकरे
- दापोली - संजय कदम, शिवसेना उद्धव ठाकरे
- उ. कोल्हापूर - राजेश क्षीरसागर, शिवसेना(चुरशीची लढत)
- कागल - हसन मुश्रीफ,राष्ट्रवादी
- माढा - अभिजीत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार
- वाई - मकरंद पाटील, राष्ट्रवादी
- पूर्व औरंगाबाद - इम्तियाज जलील, चुरशीची लढत
- सिल्लोड - अब्दुल सत्तार, शिवसेना
- दक्षिण सोलापूर - सुभाष देशमुख, भाजप
- माळशिरस - उत्तम जाणकर, राष्ट्रवादी एसपी
- सांगोला - बाबासाहेब देशमुख, शेकाप
- कोरेगाव - शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी एसपी
यादी अपडेट होत आहे...
ADVERTISEMENT