Ajit Pawar NCP Candidate List मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले आणि सगळ्याच पक्षांनी रणशिंग फुंकलंय. यंदाची निवडणूक ही काहीगोष्टींमुळे विशेष ठरणार आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे यंदाच्या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि मनसेसह अनेक इतर पक्ष मैदानात असणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या समिकरणांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच अजित पवार यांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून असतानाच त्यांची यादी समोर आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन 38 उमेदारांचे नावं घोषित केलेत.
ADVERTISEMENT
अजित पवार यांच्या 38 उमेदवारांची यादी
हे ही वाचा >>Shiv Sena (Shinde) Candidates List: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर.. कोणाला दिला धक्का?
- अजित पवार- बारामती
- दीलिप वळसे पाटील- आंबेगाव
- सुलभा खोडके- अमरावती
- दत्ता भरणे- इंदापूर
- अण्णा बनसोडे-पिंपरी
- निर्मला विटेकर-पाथरी
- सुनील शेळके-मावळ
- छगन भुजबळ- येवला
- हसन मुश्रीफ-कागल
- माणिकराव कोकाटे- सिन्नर
- नरहरी झिरवळ - दिंडोरी
- धनंजय मुंडे - परळी
- दौलत दरोडा - शहापूर
- हिरामण खोसकर - इगतपुरी
- अनिल पाटील - अमळनेर
- संग्राम जगताप - अहमदनगर
- आदिती तटकरे - श्रीवर्धन
- संजय बनसोडे- उदगीर
- बाबासाहेब पाटील - अहमदपूर
- दिलीप मोहिते-पाटील - खेड-आळंदी
- राजकुमार बडोले - अजुर्नी मोरगाव
- प्रकाश सोळंखे - माजलगाव
- मकरंद पाटील - वाई
- आशुतोष काळे - कोपरगाव
- इंद्रनील नाईक - पुसद
- भरत गावित - नवापूर
- नजीब मुल्ला - मुंब्रा-कळवा
- किरण लहामटे - अकोले
- शेखर निकम - चिपळूण
- यशवंत माने - मोहोळ
- राजेश पाटील - चंदगड
- हिरामण खोसकर - इगतपुरी
- राजू कारेमोरे - तुमसर
- चंद्रकांत नवघरे - वसमत
- नितीन पवार - कळवण
- धर्मराव बाबा आत्राम - अहेरी
- अतुल बेनके - जुन्नर
- चेतन तुपे - हडपसर
हे ही वाचा >> Ajit Pawar Candidates List : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत कोणत्या लाडक्या बहिणींना संधी?
दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंघाने आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी पूर्ण तयारी केली असून, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि भाजपने आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. तसंच वंचित बहुजन आघाडीनेही आपले शिलेदार मैदानात उतरवले आहेत. दरम्यान, मविआमध्ये जागावाटपाबद्दल अजूनही काही जागांवर वाद असल्याचं चित्र दिसतंय. विदर्भातील काही जागांचा तिढा अजूनही कायम असल्याचं दिसतंय. मात्र संजय राऊत यांनी आमची यादी तयार असून कधीही ती जाहीर करू शकतो अशी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT