Anushakti Nagar Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिक विधानसभा जिंकणार की हरणार?, 'त्या' निर्णयावर सारं काही अवलंबून!

रोहित गोळे

26 Jun 2024 (अपडेटेड: 26 Jun 2024, 05:55 PM)

Anushakti Nagar Vidhan Sabha Election 2024 Nawab Malik: लोकसभेत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिल्यास अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) उमेदवाराला चांगलं मताधिक्य मिळालं आहे. पण यामुळेच तिथले विद्यमान आमदार नवाब मलिकांसाठी एक निर्णय हा महत्त्वाचा ठरणार आहे.

Mumbaitak
follow google news

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Anushakti Nagar Constituency: मुंबई: लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्रातील राजकीय चित्र हे पूर्णपणे पालटून गेलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला यांच्यापैकी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार नवाब मलिक हे त्यांच्या अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात पुन्हा विजय मिळवू शकतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर यातील अणुशक्ती नगर विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारू शकतं याचा अंदाज आम्ही डेटाच्या माध्यमातून वर्तविणार आहोत. 

हे वाचलं का?

मुंबई दक्षिण मध्य मतदारासंघातील शिवसेना (UBT)चे  उमेदवार अनिल देसाई  सावंत यांनी 53 हजार 384 मतांनी विजय मिळवलाय. दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) उमेदवार राहुल शेवाळे यांना केवळ 3,41,754 मतं मिळाली. पण या निकालामुळे नवाब मलिक यांच्या समोरील पेच हा वाढला आहे.

आगामी विधानसभा निवडणूक ही नवाब मलिक यांच्यासाठी अगदीच पेच उभा करणार आहे. हेच येथे झालेल्या मतदानातून समजतं आहे. मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडलंय, हे आपण समजून घेऊया.

हे ही वाचा>> आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा, वरळीची जागा धोक्यात?

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) आणि शिवसेना (शिंदे गट) अशी थेट लढत झाली. शिवसेनेने (शिंदे गट) महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल शेवाळेंना तिकीट दिलं होतं. तर शिवसेना (UBT)ने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अनिल देसाईंना उमेदवारी दिली होती. पण या मतदारसंघात अनिल देसाई यांनी आश्चर्यकारकरित्या विजय मिळवत राहुल शेवाळे यांची खासदारकीची हॅटट्रिक चुकवली.  

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात नवाब मलिक यांचा अणुशक्ती नगर हा मतदारसंघ देखील येतो. जिथे शिवसेना (UBT)खासदार अनिल देसाई यांना तब्बल 29083 एवढं प्रचंड मताधिक्य मिळालं आहे. पण यामुळेच नवाब मलिक यांचे डोकेदुखी वाढली आहे.

नवाब मलिक हे तुरुंगातून सुटून आल्यापासून कोणत्याही राजकीय पक्षाच्या मंचावर दिसून आलेले नाहीत. पण विधानसभेच्या अधिवेशनात ते सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले होते. त्यामुळे ते अजित पवार गटात गेली असल्याची चर्चा सुरू झाली होती. ज्यानंतर भाजपने देखील या गोष्टीला आक्षेप घेतला होता. त्यानंतर नवाब मलिक हे पुन्हा व्हिजनवासात गेले.

हे ही वाचा>> महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा फुटणार?, पवारांचा नवा डाव अन्...

मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकं कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची या निर्णयावर मलिकांचं बरंचसं भवितव्य अवलंबून आहे. कारण त्यांच्या मतदारसंघात लोकसभेला जे मतदान झालं त्यात मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. अशावेळी नवाब मलिक हे अजित पवार गटात जाणार की शरद पवारांसोबत राहणार यावर त्यांच्या विजयाचं गणित ठरण्याची दाट शक्यता आहे. 

नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर या विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळाली?

  • अनिल देसाई (शिवसेना - UBT) - 79 हजार 767  मतं मिळाली
  • राहुल शेवाळे (शिवसेना - शिंदे गट) - 50 हजार 684 मतं मिळाली

2019 विधानसभा निवडणुकीत अणुशक्ती नगरमध्ये कोणाला किती मतं मिळालेली?

2019 विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांना अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात 65 हजार 217 मते मिळाली होती. तर शिवसेनेचे तुकाराम काटे यांना 52 हजार 466 मतं मिळाली होती.

    follow whatsapp