Ashok Chavan Nanded : ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला, ते सर्व संपले... हे शब्द आहेत भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे. नुकताच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महायुतीला मोठं यश मिळला, तर महाविकास आघाडीला धक्कादायक असा पराभव स्वीकाराला लागला. त्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांकडून विजय कसा मिळवला हे सांगितलं जातंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पराभवाच्या कारणांची चर्चा होते आहे. त्यातच आता अशोक चव्हाण यांनी पराभूत नेत्यांवर सडकून टीका केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Assembly Elections Result : मविआच्या आमदारांची संख्या घटली; पवार, राऊत, चतुर्वेदींच्या राज्यसभा खासदारकीचं काय होणार?
विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांची चांगलीच फिरकी घेतली. आपल्या मनातला राग व्यक्त करत त्यांनी सडकून टीका केली. "मला त्रास देणारे आणि संपवण्याची भाषा करणारे स्वतःच संपले झाले आहे. दोघांचा तर काठावर विजयी झाला आणि काही नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे, त्यामुळे माझ्या नादी लागू नका" असं म्हणत अशोक चव्हाण यांनी इशारा दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि अमित देशमुख यांना या विधानसभा निवडणुकीत चांगलाच धक्का बसला. पराभव झाला नसला, तरीही नाना पटोले हे अगदी थोड्या मतांनी निवडून आले आहेत. त्यावरुनच अशोक चव्हाण यांनी ही फटकेबाजी केली आहे.
हे ही वाचा >>Maharashtra CM : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस?
यंदाच्या निवडणुकीत भोकर विधानसभा मतदार संघातून श्रीजया चव्हाण यांचा विजय झाला. या विजयानंतर अशोक चव्हाण आणि श्रीजया चव्हाण हे जनतेचे आभार मानण्यासाठी गावभेटी देत आहे. यादरम्यानच एका ठिकाणी बोलताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली. "निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेते हे भोकरला येऊन मला संपवण्याची भाषा करत होते. आज त्यांची अवस्था काय झाली पाहा. लातूरच्या एका भावाचा पराभव झाला तर दुसरा कसा तरी निसटता निघाला. महाराष्ट्राचं नेतृत्व करायला निघालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील कसेबसे विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव झाला. हवेत प्रचार करणाऱ्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवली. जे जे मला त्रास देत होते, ते आज स्वतःच संपले. त्यामुळे मला त्रास देऊ नका असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला.
ADVERTISEMENT