Ajit Pawar: 'थोडक्यात वाचला.. माझी सभा झाली असती तर तुझं...', अजितदादांचा सगळ्यांसमोर रोहित पवारांना टोला

रोहित गोळे

25 Nov 2024 (अपडेटेड: 25 Nov 2024, 12:49 PM)

Ajit Pawar vs Rohit Pawar:कराडमध्ये अजित पवार आणि रोहित पवार हे आमनेसामने आले. तेव्हा अजितदादांनी रोहित पवार यांना मिश्किल शब्दात टोला मारला.

अजितदादांचा सगळ्यांसमोर रोहित पवारांना टोला

अजितदादांचा सगळ्यांसमोर रोहित पवारांना टोला

follow google news

Ajit Pawar vs Rohit Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. असं असताना आज (25 नोव्हेंबर)  शरद पवार, रोहित पवार आणि अजित पवार हे तीनही नेते कराड दौऱ्यावर आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी हे सगळे नेते कराडला आले होते.

हे वाचलं का?

याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची भेट झाली. हे दोन्ही नेते समोरासमोर आल्यावर अजित पवार यांनी रोहित पवारांना एक मिश्किल टोला यावेळी मारला.

रोहित पवार हे समोर येताच अजित पवार अगदी हसत-हसत त्यांना म्हणाले की, 'दर्शन घे, दर्शन... काकाचं... शहाण्या, थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय झालं असतं तुझं..' असं अजित पवार यावेळी म्हणाले. 

'त्या' भेटीबाबत रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

'माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो. विचारामध्ये भिन्नता आतातरी आहे. शेवटी जी काही संस्कृती आहे वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 2019 च्या निवडणुकीत त्यांनी मला बरीच मदत केली होती. त्या अनुषंगाने ते माझे काका असल्याने त्यांच्या पाया पडणं ही जबाबदारी आहे. कारण ही जी भूमी आहे चव्हाण साहेबांचं स्मृतिस्थळ आहे. या भूमीत कोणताही भेदभाव करून चालत नाही. संस्कृती पाळणं महत्त्वाचं आहे. तीच आम्ही पळतो. म्हणून मी त्यांचं दर्शन घेतलं.' 

'सभा झाली असती तर नक्कीच काही वर-खाली झालं असतं. उलटंही हो शकलं असतं. पण बारामतीत ते ऐवढे अडकून पडले होते की, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही.' 

'शेवटी ते मोठे नेते आहेत.. निर्णय त्याचा होता. आज त्यांचे आमदार सगळ्यात जास्त निवडून आले आहेत. चांगली गोष्ट आहे.. मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलंय.' असं रोहित पवार यावेळी म्हणाले. 

रोहित पवारांच्या फार कमी मताधिक्याने विजय 

विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी अगदी थोडक्या मतांनी विजय मिळवला. काही फेऱ्यांमध्ये तर ते अगदी पिछाडीवर देखील गेले होते. मात्र शेवटच्या क्षणी 1200 हून अधिक मतांनी ते निवडून आले. मागील निवडणुकीत रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदेंचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. मात्र, यंदा राम शिंदेंनी चांगली लढत दिली. 
 

    follow whatsapp