Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात काल विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालामध्ये महायुतीला मोठा विजय मिळाला. 288 पैकी तब्बल 233 जागा जिंकत महायुतीने इतिहास रचला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा झालेला पराभव हा त्यांच्यासाठी धक्कादायक होता. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे, धीरज देशमुख यांच्यासारख्या नेत्यांनाही या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या ज्या नेत्यांचा विजय झाला, त्यांच्यामध्येही अनेक नेते काठावर पास झाले आहेत. एकीकडे निवडणुकीपूर्वी जे ज्या नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग्स लागत होते. त्याच नाना पटोले यांचा अवघ्या 208 मतदांनी विजय झाला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिंदेंचे 57 शिलेदार जिंकले, किती जागांवर ठाकरेंच्या उमेदवारांना पाडलं?
राज्यातली यंदाची विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या कारणांमुळे विशेष होती. मागच्या पाच वर्षांमध्ये झालेल्या युत्या-आघाड्या. त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती. त्यानंतर दोन प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेली फूट या गोष्टींमुळे ही निवडणूक अनेकांसाठी त्यांचं भवितव्य ठरवणारी होती. मात्र महायुतीसोबत गेलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगलाच विजय मिळाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा अक्षरश: काही जिल्ह्यांमधून सुपडा साफ झाला आहे. या सर्व गोष्टींमध्ये चर्चा होतेय, ती काठावर पास झालेल्या आमदारांची. यामध्ये कुणाकुणाची नावं आहेत, ते पाहू.
ADVERTISEMENT