CM Eknath Shinde : पहिल्या यादीत नावं नाही, बंडावेळी साथ देणाऱ्या शिंदेंच्या 'या' आमदारांची धाकधूक वाढली

मुंबई तक

23 Oct 2024 (अपडेटेड: 23 Oct 2024, 04:23 PM)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आज पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने रविवारी पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षानेही पहिली यादी जाहीर करत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पहिल्या यादीत अजित पवारांनी 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिंदेंच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर

point

तीन आमदारांची नावं यादीत नाहीत

point

पहिल्या यादीत नाव नसलेले तीन आमदार कोण?


Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांमुळे वातावरण तापलंय. सगळ्याच राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. आतापर्यंत महायुतीतील शिवसेना आणि भाजपने आपली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही आपल्या 38 आमदारांची यादी जाहीर केली. गेल्या अनेक दिवसांपासून जागा वाटपावरुन सुरू असलेल्या घडामोडींनंतर अखेर उमेदवारी याद्या समोर आल्या असल्या तरी, काही जागांवरुन चर्चा बाकी असल्याचं कळतंय. त्यामुळेच पहिल्या यादीत नाव न आलेले अनेक उमेदवार सध्या चिंतेत असल्याचं दिसतंय. ( CM Eknath Shinde mls Vishwanath bhoir, shantaram more, Balaji kinikar didn't get candidature)

हे वाचलं का?


हे ही वाचा >>Amit Thackeray : उपकारांची परतफेड करावी अशी... अमित ठाकरे महायुतीबद्दल काय म्हणाले?
 


राज्यात यंदा विधानसभेच्या रिंगणात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी, मनसे, वंचित, एमआयएम, परिवर्तन महाशक्तीसह अनेक लहान पक्ष उतरले आहेत. यातील महायुती आणि महाविकास आघाडीत प्रत्येकी तीन मोठे पक्ष आहेत. त्यामुळे सर्वांसमोरच जागा वाटपाचं मोठं आव्हान होतं. या सगळ्या गोंधळात नाराजांची संख्या देखील वाढली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि धाकधूक असलेल्या अनेकांची नावं पहिल्याच यादीत आली. मात्र आता शिंदेंसोबत गुवाहाटी गाठणाऱ्या विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर आणि शांताराम मोरे यांची नावं पहिल्या यादीत न आल्यानं चर्चा सुरूय. या आमदारांना डावलल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी अद्याप फक्त 45 आमदारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत या आमदारांची नावं येणार की, नाही हे पाहणं महत्वाचं असेल. तसंच, काही मतदारसंघांवरुन एकमत होत नसल्याचंही चित्र आहे. त्यामुळे कुणाला संधी मिळते आणि कुणाला डच्चू मिळतो याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी

हे ही वाचा >>Ajit Pawar Candidates List : अजितदादांनी 38 जणांची नावं केली जाहीर, पण कोणत्या विश्वासू आमदारांना दिली संधी?

 

1. एकनाथ शिंदे - कोपरी पाचपाखाडी 
2. साक्री - मंजुळा गावीत
3. चोपडा - चंद्रकांत सोनवणे 
4. जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील 
5. पाचोरा - किशोर पाटील 
6. एरंडोल - अमोल पाटील 
7. मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील 
8. बुलढाणा - संजय गायकवाड 
9. मेहकर - संजय रायमुलकर 
10.दर्यापूर - अभिजीत अडसूळ 11. आशिष जयस्वाल - रामटेक 
12. भंडारा - नरेंद्र भोंडेकर 
13. दिग्रस - संजय राठोड 
14. नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर 
15.कळमनुरी - संतोष बांगर 
16. जालना - अर्जुन खोतकर 
17.सिल्लोड - अब्दुल सत्तार 
18.छ संभाजीनगर मध्य - प्रदीप जयस्वाल 
19. छ. संभाजीनगर पश्चिम - संजय सिरसाट 
20. पैठण - रमेश भूमरे 
21.वैजापूर - रमेश बोरनारे 
22.नांदगाव -  सुहास कांदे 
23. मालेगाव बाह्य - दादाजी भूसे 
24. ओवळा माजीवडा - प्रताप सरनाईक 
25. मागाठाणे - प्रकाश सुर्वे 
26. जोगेश्वरी पूर्व - मनीषा वायकर 
27. चांदिवली - दिलीप लांडे 
28. कुर्ला - मंगेश कुडाळकर
29. माहीम - सदा सरवणकर 
30. भायखळा - यामिनी जाधव 
31. कर्जत महेंद्र थोरवे
32. अलिबाग - महेंद्र दळवी 
33. महाड - भरत गोगावले 
34. उमरगा - ज्ञानराज चौगुले
35. सांगोला - शहाजीबापू पाटील 
36. कोरेगाव - महेश शिंदे 
37. परांडा - तानाजी सावंत 
38. पाटण - शंभूराज देसाई 
39. दापोली - योगेश कदम 
40. रत्नागिरी - उदय सामंत 
41. राजापूर - किरण सामंत 
42. सावंतवाडी - दीपक केसरकर 
43. राधानगरी - प्रकाश आबिटकर 
44. करवीर - चंद्रदीप नरके 
45. खानापूर - सुहास बाबर 

    follow whatsapp