Dharavi Vidhan Sabha Election 2024: धारावीचा पेपर सोपा, पण विधानसभेला उमेदवार कोण

रोहित गोळे

26 Jun 2024 (अपडेटेड: 26 Jun 2024, 06:33 PM)

Dharavi Vidhan Sabha Election 2024 Varsha Gaikwad: लोकसभा निवडणुकीमध्ये धारावी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) उमेदवार अनिल देसाईंना सर्वाधिक मताधिक्य मिळालं. यामुळे ही जागा महाविकास आघाडीसाठी सोपी मानली जात आहे.

Mumbaitak
follow google news

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Dharavi Constituency: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं. त्यातच धारावी विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीसाठी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सोप्पा पेपर ठरण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांना मोठं मताधिक्य दिलं. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा दारूण पराभव झाला.

हे वाचलं का?

धारावी विधानसभा ही महाविकास आघाडीसाठी सोप्पी जागा असली तरी आता इथे नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार किंवा कोणत्या पक्षाच्या वाटेला ही जागा जाणार यावर बरंच गणित अवलंबून आहे. कारण की, धारावी मतदारसंघाच्या आमदार वर्षा गायकवाड या आता लोकसभेत निवडून गेल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस येथे नेमकं कोणाला तिकीट देणार यावर देखील निकाल अवलंबून आहे.

हे ही वाचा>> ठाकरेंच्या शिलेदाराचं टेन्शन वाढलं, चेंबूरची जागा कशी राखणार?

धारावी विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीला नेमकं कोण बाजी मारु शकतं याचा अंदाज आम्ही डेटाच्या माध्यमातून वर्तविणार आहोत. 

मुंबई दक्षिण मध्य मतदारासंघातील शिवसेना (UBT)चे  उमेदवार अनिल देसाई  सावंत यांनी 53 हजार 384 मतांनी विजय मिळवला. तर शिवसेना (शिंदे गट) उमेदवार राहुल शेवाळे यांना 3,41,754 मतं मिळाली होती. या निकालामुळे काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडलंय, हे आपण समजून घेऊया.

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) आणि शिवसेना (शिंदे गट) अशी थेट लढत झाली. शिवसेनेने (शिंदे गट) महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल शेवाळेंना तिकीट दिलं होतं. तर शिवसेना (UBT)ने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अनिल देसाईंना उमेदवारी दिली होती. पण या मतदारसंघात अनिल देसाई यांनी मोठा विजय मिळवत राहुल शेवाळे यांना पराभूत केलं.

हे ही वाचा>> नवाब मलिक जिंकणार की हरणार?, 'त्या' निर्णयावर सारं अवलंबून!

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांचा धारावी हा मतदारसंघ येतो. याच मतदारसंघात शिवसेना (UBT)खासदार अनिल देसाई यांना तब्बल 36,857 असं मोठं मताधिक्य मिळालं. यामुळे हा मतदारसंघ मविआसाठी विशेषत: काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

वर्षा गायकवाड यांच्या धारावी विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळाली?

  • अनिल देसाई (शिवसेना - UBT) - 76 हजार 677  मतं मिळाली
  • राहुल शेवाळे (शिवसेना - शिंदे गट) - 39 हजार 820 मतं मिळाली

2019 विधानसभा निवडणुकीत धारावीमध्ये कोणाला किती मतं मिळालेली?

2019 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना धारावी विधानसभा मतदारसंघात 53 हजार 954 मते मिळालेली. तर शिवसेनेच्या आशिष मोरेंना 42 हजार 130 मतं मिळालेली. तर या मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार मनोज संसारे हे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना एकूण 13,099 मतं मिळाली होती. याच मतदारसंघात मनसे हा पक्ष चौथ्या क्रमांकावर होता. त्यांचे उमेदवार कवाडे संदीप यांना केवळ 4,062 मतं मिळालेली.

    follow whatsapp