Election Commission : उद्धव ठाकरेंची बॅग तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाचं पत्र

मुंबई तक

13 Nov 2024 (अपडेटेड: 13 Nov 2024, 12:02 PM)

उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर वणीमध्ये उतरताच त्यांच्या हेलिकॉप्टरकडे येत निवडणूक आयोगाने त्यांची बॅग आणि हेलिकॉप्टरमधील काही सामान तपासलं होतं.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंची बॅग तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना पत्र

point

वणीमध्ये हेलिपॅडवर झाली होती तपासणी

point

निवडणूक आयोगाने पत्रात काय म्हटलं?

Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. एकीकडे नेतेमंडळी प्रचारासाठी पूर्ण जोर लावत आहेत, तर दुसरीकडे निवडणूक आयोगही निवडणुकीसाठी मोठ्या तयारीत आहे. प्रचारासाठी नेत्यांचे दौरे सुरू असताना नेतेमंडळी सध्या राज्यभरात दौरे करत आहेत. यादरम्यानच उद्धव ठाकरे यांची बॅग चेक केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर असताना वणीमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची बॅग चेक केली होती. त्यानंतर औसा दौऱ्यावर असातना तिथेही त्यांची बॅग चेक करण्यात आली. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी स्वत: व्हिडीओ घेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात या मुद्द्याची मोठी चर्चा होत होती. मात्र या सर्व घडामोडींनंतर निवडणूक आयोगाने या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Uddhav Thackeray : "वडिलांना झालेल्या वेदना मी...", रक्ताच्या नात्याबद्दल उद्धव ठाकरे सविस्तर बोलले

उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर वणीमध्ये उतरताच त्यांच्या हेलिकॉप्टरकडे येत निवडणूक आयोगाने त्यांची बॅग आणि हेलिकॉप्टरमधील काही सामान तपासलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर संताप व्यक्त करत तुम्ही इतर सत्ताधारी नेत्यांचे हेलिकॉप्टर तपासता का? असा सवाल केला होता. त्यानंतर विरोधकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आता मात्र आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंची बॅग तपासणाऱ्या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे. 

निवडणूक आयोगाने पाठ थोपटली

"प्रिय पथक सदस्य, महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 दरम्यान दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी वणी येथे स्टार प्रचारक यांच्या हेलीकॉप्टरची तपासणी करतांना आपण ज्या मेहनती व समर्पक रितीने जबाबदारी पार पाडली त्याबद्दल मी सामान्य निरीक्षक, 76-वणी व 77-राळेगाव या नात्याने आपले कौतुक करू इच्छितो.या तपासणी दरम्यान भरारी पथकाने निष्पक्षपातीपणा राखुन भारत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून शोध घेतला. या कार्यप्रणालीमुळे भारतातील कोणत्याही निवडणुकीचे अपेक्षित वैशिष्टय असलेल्या निष्पक्षता आणि पारदर्शकतेच्या तत्वांना केवळ बळकटी दिली नाही तर भारत निवडणुक आयोगाकडून अपेक्षित उच्च मानके देखील प्रतिबिंबीत केली. जस-जसे आपण निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात येत आहोत तस-तसे मला आशा आहे की, आपल्या कर्तव्याचा हा स्तर कायम राहील. तुमच्या कर्तव्याप्रती समर्पणाबद्दल आणि आपल्या लोकशाही प्रकियेला आधार देणा-या मुल्यांना मुर्त रूप दिल्याबद्दल धन्यवाद" अशा आशयाचे पत्र विधानसभा निवडणूक मतदारसंघाचे सामान्य निरीक्षक म्हणून सज्जन रासेकर यांनी तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठवले.

    follow whatsapp