Nawab Malik : निवडणुकीच्या तोंडावर मलिकांना धक्का, 'या' गोष्टीवर आक्षेप घेत ईडीकडून न्यायालयात याचिका

विद्या

12 Nov 2024 (अपडेटेड: 12 Nov 2024, 01:32 PM)

मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अनेक महिने तुरूंगात काढल्यानंतर नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांसाठी जामीन मिळाला आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

नवाब मलिकांविरोधात ईडी न्यायालयात

point

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मलिकांच्या अडचणी वाढणार

point

नवाब मलिक शिवाजीनगर-मानखुर्दमधून निवडणुकीच्या मैदानात

 नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नवाब मलिक हे सध्या अजित पवार यांच्याकडून उमेदवारी मिळालेली आहे. ते शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून ही निवडणूक लढत आहे. यादरम्यानच त्यांचं टेन्शन वाढलेलं आहे. कारण उच्च न्यायालयामध्ये ईडीकडून आज एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये नवाब मलिक हे मनी लॉन्ड्रींग प्रकरणात मिळालेल्या जामिनाचा गैरवापर होतोय असं ईडीने म्हटलं आहे. 
 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Sanjay Raut Vs Raj Thackeray : दादर-माहिम मतदारसंघ आम्ही सोडूच शकत नाही, राऊतांनी सांगितलं कारण

मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अनेक महिने तुरूंगात काढल्यानंतर नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांसाठी जामीन मिळाला. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत असल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांना अजित पवार यांच्याकडून उमेदवारीही मिळाली. सध्या नवाब मलिक हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आपली ताकद लावताना दिसत आहे. 

 

हे ही वाचा >>Prakash Ambedkar : ...तर अजित पवारांनी आमच्यासोबत यावं, प्रकाश आंबेडकरांनी का दिली ऑफर?

 

नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या सुद्धा अणुशक्तिनगर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आहेत. नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यावरुन अनेक दिवस महायुतीमध्ये वाद सुरू होता. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असल्यानं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांना विरोध केला होता. तसंच त्यानंतर अखेरच्या क्षणी नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर भाजप नेत्यांनी आपण नवाब मलिक यांच्या प्रचारात जाणार नसल्याचं सांगितलं होतं. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बुलेट पाटील यांना नवाब मलिक यांना उमेदावारी दिली असून, महायुती त्यांचा प्रचार करणार असल्याचं समजतंय.

    follow whatsapp