Sharad Pawar: '...तर मला झोपच येणार नाही', पवारांनी 'त्या' गोष्टीचं गुपितच सांगून टाकलं!

राजदीप सरदेसाई

09 Nov 2024 (अपडेटेड: 09 Nov 2024, 04:54 PM)

Sharad Pawar NCP-SP: आपण सक्रीय राजकारणातून निवृत्त होणार नाही, असं शरद पवार यांनी मुंबई Tak सोबत बोलताना स्पष्ट केलं आहे. जाणून घ्या ते नेमकं काय म्हणाले.

शरद पवारांनी 'त्या' गोष्टी गुपितच सांगून टाकलं!

शरद पवारांनी 'त्या' गोष्टी गुपितच सांगून टाकलं!

follow google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवार हे सक्रीय राजकारणातून निवृत्त होणार नाही

point

मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पाहा काय म्हटलं

point

शरद पवारांना दौऱ्यांवर जाणं का आवडतं?

Sharad Pawar Politics: नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातून निवृत्त होणार अशा चर्चांनी मागील काही दिवसांपासून जोर धरला आहे. पण असं काहीही होणार नसल्याचं स्वत: शरद पवार यांनी मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं आहे. याशिवाय शरद पवार हे आजही दौरे का करतात, लोकांमध्ये सातत्याने का मिसळतात याचंही गुपित त्यांनी यावेळी सांगितलं आहे. (exclusive interview if i dont go on tours i wont be able to sleep sharad pawar clarified that he will not retire from politics)

हे वाचलं का?

शरद पवार यांची ही शेवटची निवडणूक आहे, त्यामुळे आता ते दौऱ्यावर जाणार नाही. अशी चर्चा सुरू आहे. याचबाबत जेव्हा शरद पवार यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी या सगळ्या चर्चांना चुकीचं ठरवलं.

हे ही वाचा>> Devendra Fadnavis: 'परिस्थिती पाहून आम्ही...', मुख्यमंत्री पदावरून फडणवीसांचं मोठं विधान, शिंदेंचं टेन्शन वाढवलं!

पवार यावर बोलताना म्हणाले की, 'असं आहे की, दौऱ्यावर गेलो नाही तर मला झोपच येणार नाही. मला दौऱ्यावर जाणं, लोकांना भेटणं, लोकांशी डायलॉग करणं याच्याशिवाय चैन पडत नाही. हे मी करतच राहणार.'

पाहा शरद पवार या मुलाखतीत नेमकं काय-काय म्हणाले. 

प्रश्न: शरद पवार राजकारणातून निवृत्त होत आहे का? 

शरद पवार: अजिबात नाही... दोन गोष्टी असतात, राजकारणामध्ये सत्ता, विधिमंडळ, संसद याचं एक काम आणि दुसऱ्या बाजूला संघटन मी संघटनमध्ये अधिक लक्ष देण्याचा विचार केला आहे. नवी पिढी एका मोठ्या प्रमाणात तयार करणार राज्यामध्ये. त्याची काळजी घेणार, या निवडणुकीमध्ये देखील आमचा अॅप्रोच हाच होता. आज जर तुम्ही आमचे उमेदवार बघितले, सांगलीमध्ये गेला तर त्याठिकाणी... आर. आर. पाटलांचे चिरंजीव हा तरूण उमेदवार उभा आहे. तो उत्तम वक्ता आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election 2024 Live : कोणता गरीब झोपडपट्टीत दिसल्यास सांगा, त्यांना घर बांधून देणार – PM नरेंद्र मोदी

तुम्ही अहमदनगरमध्ये गेलात तर रोहित पवार माझ्याच कुटुंबातला.. तरुण त्या ठिकाणी उभा केलाय. बारामतीला गेलात तर तिथेसुद्धा युगेंद्र. अमेरिकेमध्ये चांगलं शिक्षण करून परत आलेला आणि नंतर शेती, उसाचा धंदा, शुगर प्रोसेसिंग या सगळ्यात रस घेणारा. तो तिथे उभा केलेला. अशी एक नव्या पिढीची फौज ही आम्हाला तयार करायची आहे की, जे महाराष्ट्राच्या हिताची जपणूक पुढची पाच-पन्नास वर्ष करतील. 

प्रश्न: निवडणुकीच्या राजकारणातून तुम्ही कदाचित निवृत्त व्हाल, पण संघटनचं काम तुम्ही शेवटपर्यंत करणार?

शरद पवार: लोकसभा आणि तत्सम निवडणुका मी 2014 सालीच सोडल्या. त्यानंतर मी कधी उभा राहिलो नाही. मी राज्यसभेत आलो. राज्यसभेची माझी अजून दोन वर्ष आहेत. त्यानंतर काय करावं याचा विचार मी करतोय, पण एक गोष्ट आहे.. पक्षबांधणी याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीच्या कामामध्ये मी यत्किंचितही मागे जाणार नाही. पूर्ण वेळ त्याला देणार.. 

प्रश्न: म्हणजे ही तुमची शेवटची निवडणूक नाही, लोकं म्हणतात आता 84 वर्षांचे झाले आता तुम्ही दौऱ्यावर जाणार नाही..

शरद पवार: असं आहे की, दौऱ्यावर गेलो नाही तर मला झोपच येणार नाही. मला दौऱ्यावर जाणं, लोकांना भेटणं, लोकांशी डायलॉग करणं याच्याशिवाय चैन पडत नाही. हे मी करतच राहणार.

    follow whatsapp