Eknath Shinde: 33 आमदार, 9 नवखे आणि 3 अपक्ष... CM शिंदेंनी एका दगडात किती पक्षी मारले?

मुंबई तक

• 10:34 PM • 23 Oct 2024

Eknath Shinde Shiv Sena candidates list: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाची पहिली यादी जाहीर करताना कोणतीही मोठी रिस्क घेतली नाही. मात्र त्याचवेळी काही वेगळ्या चाली देखील त्यांनी खेळल्या आहेत.

CM शिंदेंनी एका दगडात किती पक्षी मारले?

CM शिंदेंनी एका दगडात किती पक्षी मारले?

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिंदेंच्या शिवसेनेने भाजपच्या तीन जागा खेचल्या, उमेदवार कोण?

point

CM शिंदेंनी एका दगडात मारले अनेक पक्षी

point

त्याच आमदारांना पुन्हा तिकीट देणं शिवसेनेसाठी ठरणार फायदेशीर?

अतिक शेख, मुंबई: महायुतीचं जागा वाटप हे हळूहळू मार्गी लागत आहे. कारण यामधील तीनही पक्षांनी आता आपआपली पहिली यादी ही जाहीर केली आहे. दरम्यान, काल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. (maharashtra assembly election 2024 33 mla 9 newbies and 3 independents how did cm eknath shinde do politics while announcing the list)

हे वाचलं का?

CM शिंदेंनी एका दगडात किती पक्षी मारले?

यामध्ये 33 विद्यमान आमदार, 9 आमदार नसलेले उमेदवार आणि 3 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. शिंदेंकडून आमदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा सुरू असताना शिंदेंनी मात्र बहुतांश आमदारांना तिकीट देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

हे ही वाचा>> Shiv Sena (Shinde) Candidates List: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर.. कोणाला दिला धक्का?

परंतु मागच्या वेळी भाजपने लढलेल्या विधानसभेच्या तीन जागा शिंदेंच्या शिवसेनेने खेचून घेतल्या आहे. यामध्ये विदर्भातील दोन तर उत्तर महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.

99 उमेदवारांची यादी घोषित करताना भाजपने शिवसेनेच्या पाच जागा खेचल्या होत्या. तसेच शिवसेनेने देखील 2019 मध्ये भाजपने लढलेल्या तीन जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहे. यामध्ये मुक्ताईनगर, भंडारा आणि रामटेकच्या जागेचा समावेश आहे.

हे ही वाचा>> Shiv Sena UBT 1st List: ठाकरेंच्या पहिल्याच यादीत 65 नावं, तुमच्या मतदारसंघात Shiv Sena UBT चा कोण उमेदवार?

मुक्ताईनगरमध्ये 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या रोहिणी खडसेंचा पराभव झाला होता. तर अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील निवडणूक जिंकले होते. याशिवाय रामटेकमध्ये भाजपचे उमेदवार द्वाराम रेड्डी यांचा पराभव झाला तर अपक्ष लढलेले आशिष जैस्वाल जिंकले होते. भंडाऱ्यात मागच्या वेळी अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांचा विजय झाला तर भाजपचे उमेदवार अरविंद भालांधरे हे पराभूत झाले होते. 

चंद्रकांत पाटील, आशिष जैस्वाल, नरेंद्र भोंडेकर या तिन्ही अपक्ष आमदारांना शिंदेंनी शिवसेनेत सामील करून घेतलं. याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरची उमेदवारी जाहीर करून शिंदेनी भाजपच्या तीन जागा खेचून घेतल्याने यावरून चांगलीच चर्चा रंगली आहे.

    follow whatsapp