NCP-SP Party 2nd Candidate List: पवारांकडून दिग्गज नेत्यांना तिकीट, दुसरी यादी जाहीर

मुंबई तक

• 04:42 PM • 26 Oct 2024

NCP Sharadchandra Pawar Party Candidate List: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता दुसरी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये NCP (SP) ने 22 जणांना उमेदवारी दिली आहे. पहिल्या यादीत त्यांनी 45 उमेदवारांना तिकीट दिलं होतं.

पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरी यादी केली जाहीर

point

दुसऱ्या यादीत 22 जणांच्या नावाची घोषणा

point

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाकडून दिग्गज नेत्यांना पुन्हा उमेदवारी

Maharashtra Assembly Election 2024 NCP Sharadchandra Pawar Party 2nd Candidate List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाने आज (26 ऑक्टोबर) त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत 22 उमेदवारांची ही दुसरी यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने 67 जागा घोषित केल्या आहेत.

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 NCP (NCP Sharadchandra Pawar Party 1st Candidates List)

  1. एरंडोल - सतीश आण्णा पाटील 
  2. गंगापूर - सतीश चव्हाण
  3. शहापूर - पांडुरंग बरोरा 
  4. परांडा - राहुल मोटे
  5. बीड - संदीप क्षीरसागर
  6. आर्वी - मयुरा काळे 
  7. बागलाण - दीपिका चव्हाण
  8. येवला - माणिकराव शिंदे 
  9. सिन्नर - उदय सांगळे 
  10. दिंडोरी - सुनिता चारोसकर 
  11. नाशिक पूर्व - गणेश गीते 
  12. उल्हासनगर - ओमी कलानी 
  13. जुन्नर - सत्यशील शेरकर 
  14. पिंपरी - सुलक्षणा शिलवंत 
  15. खडकवासला - सचिन दोडके 
  16. पर्वती - अश्विनी कदम
  17. अकोले - अमित भांगरे 
  18. अहिल्यानगर शहर - अभिषेक कळमकर
  19. माळशिरस - उत्तम जानकर 
  20. फलटण - दीपक चव्हाण 
  21. चंदगड - नंदिनी बाभूळकर-कुपेकर
  22. इचलकरंजी - मदन कारंडे 

पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 NCP (NCP Sharadchandra Pawar Party 1st Candidates List)

  1. इस्लामपूर - जयंत पाटील 
  2. काटोल - अनिल देशमुख 
  3. कराड उत्तर - बाळासाहेब पाटील 
  4. घणसावंगी -राजेश टोपे 
  5. मुंब्रा कळवा- जितेंद्र आव्हाड 
  6. कोरेगाव-शशिकांत शिंदे 
  7. वसमत - जयप्रकाश दांडेगावकर 
  8. जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर
  9. इंदापूर - हर्षवर्धन पाटील
  10. राहुरी - प्राजक्ता तनपुरे
  11. शिरूर - अशोक पवार
  12. शिराळा - मानसिंग नाईक
  13. विक्रमगड- सुनील भूसारा 
  14. कर्जत जामखेड- रोहित पवार 
  15. अहमदपूर- विनायक पाटील 
  16. सिंदखेड राजा - राजेंद्र शिंगणे 
  17. उदगीर - सुधाकर भालेराव 
  18. भोकरदन - चंद्रकांत दानवे
  19. तुमसर : चंद्रकांत वाघमारे 
  20. किनवट- प्रदीप नाईक 
  21. जिंतूर - विजय भांबळे
  22. केज - पृथ्वीराज साठे 
  23. बेलापूर- संदीप नाईक 
  24. वडगाव शेरी-  बापूसाहेब पाठारे 
  25. जामनेर- दिलीप घोडपे 
  26. मुक्ताईनगर - रोहिणी खडसे 
  27. मुर्तीजापूर- सम्राट डोंगरदिवे 
  28. नागपूर पूर्व - दिनेश्वर पेठे
  29. तिरोडा - रविकांत बोपचे
  30. अहेरी - भाग्यश्री आत्राम
  31. बदनापूर - रुपकुमार उर्फ बबलू चौधरी
  32. मुरबाड - सुभाष पवार
  33. घाटकोपर पूर्व - राखी जाधव
  34. आंबेगाव - देवदत्त निकम
  35. बारामती - युगेंद्र पवार
  36. कोपरगाव -संदीप वरपे 
  37. शेवगाव - प्रताप ढाकणे
  38. पारनेर - राणी लंके
  39. आष्टी - मेहबूब शेख
  40. करमाळा - नारायण पाटील
  41. सोलापूर शहर उत्तर - महेश कोठे
  42. चिपळूण - प्रशांत यादव
  43. कागल - समरजीतसिंह घाटगे
  44. तासगाव कवठेमहांकाळ - रोहित पाटील
  45. हडपसर- प्रशांत जगताप

अजितदादांच्या बंडानंतरही शरद पवारांचा झंझावात

2023 साली अजित पवार यांनी पक्षात मोठं बंड केलं. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह देखील मिळवलं. मात्र, असं असताना देखील शरद पवार यांनी त्यांच्या विशिष्ठ शैलीत राजकारणाला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार हा नवा पक्ष आणि तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह घेत पवारांनी त्यांचे राजकीय डावपेच खेळण्यास सुरुवात केली. ज्याचा फायदाही त्यांना लोकसभा निवडणुकीत झाला.

    follow whatsapp