Shiv Sena UBT Candidate List : शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी 'सामना'तून जाहीर! वाचा एका क्लिकवर...  

रोहिणी ठोंबरे

26 Oct 2024 (अपडेटेड: 26 Oct 2024, 12:05 PM)

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी शिवसेना ठाकरे गटानेने (Shiv Sena UBT) आज दुसरी यादी जाहीर केली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; कोणाला संधी?

point

ठाकरेंचें विश्वासू असलेल्या शिंदेंनी का केलं बंड 

point

ठाकरेंच्या पहिल्या यादीत 65 जणांना उमेदवारी, पाहा संपूर्ण यादी

Maharashtra Assembly Election 2024 Shiv Sena (UBT) 2nd Candidates List : मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी शिवसेना ठाकरे गटानेने (Shiv Sena UBT) आज दुसरी यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ही दुसरी यादी जाहीर करत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पहिल्या यादीत त्यांनी 65 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता 15 उमेदवारांची यादी समोर आली आहे. ही नावं 'सामना' या वृत्तपत्रातून जाहीर करण्यात आली आहेत. (maharashtra assembly election vidhan sabha 2024 shiv sena ubt announces second list of candidates)

हे वाचलं का?

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने महाविकास आघाडीत सर्वाधिक 21 जागा लढवल्या होत्या. पण त्यांना केवळ 9 जागांवरच विजय मिळवता आला होता. मात्र, त्यांच्या आघाडीचा त्यांचे मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांना बराच फायदा झाला होता. त्यामुळेच लोकसभेत तुलनेने कमी जागा निवडून आल्या तरीही ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा लढविण्यावर ठाम आहेत.
 
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंसमोर CM एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं सर्वात मोठं आव्हान आहे. कारण या निवडणुकीत दोन्ही पक्षांचं अस्तित्व हे पणाला लागलं आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर आता दोन्ही शिवसेना या पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; कोणाला संधी?

  1. धुळे शहर- अनिल गोटे
  2. चोपडा (अज)- राजू तडवी
  3. जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन, 
  4. बुलढाणा- जयश्री शेळके, 
  5. दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
  6. हिंगोली- रूपाली राजेश पाटील
  7. परतूर- आसाराम बोराडे
  8. देवळाली (अजा) योगेश घोलप
  9. कल्याण पश्चिम- सचिन बासरे
  10. कल्याण पूर्व - धनंजय बोडारे
  11. वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
  12. शिवडी- अजय चौधरी
  13. भायखळा- मनोज जामसुतकर
  14. श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
  15. कणकवली- संदेश भास्कर पारकर 

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद अन्...

2019 विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने  भाजपसोबत युतीमध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेने 124 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ज्यापैकी 56 आमदार हे निवडून आले होते. तर भाजपचे 105 आमदार विजयी झालेले. अशावेळी मुख्यमंत्री पदावरून बोलणी फिस्कटल्याने उद्धव ठाकरेंनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीने सत्ता स्थापन करून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद मिळवलं. मात्र, 2022 साली एकनाथ शिंदेंनी पक्षात प्रचंड मोठं बंड केलं. ज्यामुळे उद्धव ठाकरेंना आपलं मुख्यमंत्री पद गमवावं लागलं. 

ठाकरेंचें विश्वासू असलेल्या शिंदेंनी का केलं बंड 

एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचं अत्यंत विश्वासू समजले जात होते. 2019 विधानसभा निकालानंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार समजले जात होते. मात्र, अचानक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याने शिंदेंच्या महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसल्याचं अनेक राजकीय जाणाकार सांगतात. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने एकनाथ शिंदेंचं मातोश्रीवरील वजन कमी झालं होतं. अशातच भाजपने एकनाथ शिंदेंच्या साथीने 2022 साली ठाकरेंचं सरकार पाडून राज्यात शिंदे सरकार स्थापन केलं. 

विधानसभा निवडणूक ठाकरेंसाठी निर्णायक

विधानसभा  निवडणूक 2024 ही उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. आतापर्यंत दोन्ही शिवसेना या आपणच खरी शिवसेना आहोत असा दावा करत आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत कोणत्या शिवसेनेला महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp