Shiv Sena UBT Candidates List: ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर, कुणाकुणाला मिळाली संधी?

मुंबई तक

26 Oct 2024 (अपडेटेड: 26 Oct 2024, 07:27 PM)

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना (UBT) पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी तीन उमेदवारांना संधी दिली आहे.

maharashtra assembly election 2024 constituency wise shiv sena ubt third list candidates announce uddhav thackeray mva

ठाकरेंची तिसरी यादी जाहीर

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंचे शिवसेनेचे शिलेदार ठरले, तिसरी यादी आली समोर

point

विधानसभा निवडणुकीत ठाकरे किती जागा लढवणार?

point

ठाकरेंनी कोणाकोणाला दिली उमेदवारी?

Maharashtra Assembly Election 2024 Shiv Sena (UBT) Third Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी शिवसेना (UBT) पक्षाने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीत ठाकरेंनी फत्त 3 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ठाकरेंनी 83 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. maharashtra assembly election 2024 constituency wise shiv sena ubt third list candidates announce uddhav thackeray mva

हे वाचलं का?

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी काही वेळापुर्वी पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरेंनी दुसरी यादी जाहीर केली होती, या यादीत 15 नावांचा समावेश होता. आणि आता ठाकरेंनी तिसरी यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये फक्त तीन नावाचा समावेश आहे. हे तीन उमेदवार कोण आहेत? ते पाहूयात. 

पाहा शिवसेना (UBT) पक्षाची तिसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena (UBT) 3rd Candidates List)  

१६४ वर्सोवा - हरुन खान
१६९ घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव
१६७ विलेपार्ले - संदिप नाईक

हे ही वाचा : Congress Candidates 2nd List: काँग्रेसची दुसरी यादी आली समोर, MVA मध्ये नवं राजकारण?

महाविकास आघाडीने आधी 85-85-85 चा फॉर्म्युला सांगितेला आणि 18 जागा या मित्रपक्षांना सोडणार होते. त्यामुळे आणखी 15 जागा उरत होत्या. ज्या प्रत्येकी पाच वाटल्या जाणार होत्या. त्यानुसार महाविकास आघाडी प्रत्येकी 90 जागांवर लढणार आहे. ठाकरेंनी आता फक्त 83 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. आता ठाकरे आणखी 7 जागांवर कोणते उमेदवार जाहीर करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

 

पाहा शिवसेना (UBT) पक्षाची दुसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena (UBT) 2nd Candidates List)

धुळे शहर- अनिल गोटे
चोपडा (अज)- राजू तडवी
जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन, 
बुलढाणा- जयश्री शेळके, 
दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोली- रूपाली राजेश पाटील
परतूर- आसाराम बोराडे
देवळाली (अजा) योगेश घोलप
कल्याण पश्चिम- सचिन बासरे
कल्याण पूर्व - धनंजय बोडारे
वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
शिवडी- अजय चौधरी
भायखळा- मनोज जामसुतकर
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
कणकवली- संदेश भास्कर पारकर 

हे ही वाचा : Sudhir Salvi Shivadi : मुंबईतल्या बड्या नेत्याला उमेदवारी नाही, ठाकरेंना शिवडी विधानसभा जड जाणार?

शिवसेना (UBT) पक्षाची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena (UBT) 1st Candidates List)

चाळीसगाव – उन्मेश पाटील
पाचोरा – वैशाली सुर्यवंशी
मेहकर (अजा) – सिद्धार्थ खरात
बाळापूर – नितीन देशमुख
अकोला पूर्व – गोपाल दातकर
वाशिम (अजा) - डॉ. सिद्धार्थ देवळे
बडनेरा – सुनील खराटे
रामटेक – विशाल बरबटे
वणी – संजय देरकर
लोहा – एकनाथ पवार
कळमनुसी – डॉ. संतोष टारफे
परभणी – डॉ. राहुल पाटील
गंगाखेड – विशाल कदम
सिल्लोड – सुरेश बनकर
कन्नड – उदयसिंह राजपुत
संभाजीनगर मध्य – किशनचंद तनवाणी
संभाजीनगर प. (अजा) – राजु शिंदे
वैजापूर – दिनेश परदेशी
नांदगांव – गणेश धात्रक
मालेगांव बाह्य – अद्वय हिरे
निफाड – अनिल कदम
नाशिक मध्य – वसंत गीते
नाशिक पश्चिम – सुधाकर बडगुजर
पालघर (अज) – जयेंद्र दुबळा
बोईसर (अज) – डॉ. विश्वास वळवी
भिवंडी ग्रामीण (अज) – महादेव घाटळ
अंबरनाथ – (अजा) – राजेश वानखेडे
डोंबिवली – दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर
ओवळा – माजिवडा – नरेश मणेरा
कोपरी पाचपाखाडी – केदार दिघे
ठाणे – राजन विचारे
ऐरोली – एम.के. मढवी
मागाठाणे – उदेश पाटेकर
विक्रोळी – सुनील राऊत
भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नर
दिंडोशी – सुनील प्रभू
गोरेगांव – समीर देसाई
अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
चेंबूर – प्रकाश फातर्पेकर
कुर्ला (अजा) – प्रविणा मोरजकर
कलीना – संजय पोतनीस
वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
माहिम – महेश सावंत
वरळी – आदित्य ठाकरे
कर्जत – नितीन सावंत
उरण – मनोहर भोईर
महाड – स्नेहल जगताप
नेवासा – शंकरराव गडाख
गेवराई – बदामराव पंडीत
धाराशिव – कैलास पाटील
परांडा – राहुल ज्ञानेश्वर पाटील
बार्शी – दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण – अमर रतिकांत पाटील
सांगोले – दीपक आबा साळुंखे
पाटण – हर्षद कदम
दापोली – संजय कदम
गुहागर – भास्कर जाधव
रत्नागिरी – सुरेंद्रनाथ (बाळ) माने
राजापूर – राजन साळवी
कुडाळ – वैभव नाईक
सावंतवाडी – राजन तेली
राधानगरी – के.पी. पाटील
शाहुवाडी – सत्यजीत आबा पाटील

 

    follow whatsapp