Shiv Sena UBT Candidates List: उद्धव ठाकरेंचे शिलेदार ठरले, पहिली यादी जाहीर... कोणाकोणाची नावं?

रोहित गोळे

23 Oct 2024 (अपडेटेड: 23 Oct 2024, 07:37 PM)

Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shiv sena: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना (UBT) पक्षाने त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी 65 उमेदवारांना संधी दिली आहे.

Constituency Wise Shiv Sena (Shinde) Candidates: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची यादी जाहीर

Constituency Wise Shiv Sena (Shinde) Candidates: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची यादी जाहीर

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंचे शिवसेनेचे शिलेदार ठरले, पहिली यादी आली समोर

point

विधानसभा निवडणुकीत ठाकरे किती जागा लढवणार?

point

ठाकरेंनी कोणाकोणाला दिली उमेदवारी?

Maharashtra Assembly Election 2024 Shiv Sena (UBT) 1st Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी शिवसेना (UBT) पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीमध्ये अत्यंत आक्रमकपणे जागा वाटपात भूमिका घेतल्याने यादी जाहीर करण्यात त्यांना काहीसा अवधी लागला. मात्र, आता पहिली यादी जाहीर झाल्याने बरंचसं चित्र हे स्पष्ट झालं आहे. पहिल्या यादीत शिवसेना (UBT) ने 65 उमेदवार जाहीर केले आहेत.

हे वाचलं का?

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने महाविकास आघाडीत सर्वाधिक 21 जागा लढवल्या होत्या. पण त्यांना केवळ 9 जागांवरच विजय मिळवता आला होता. मात्र, त्यांच्या आघाडीचा त्यांचे मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांना बराच फायदा झाला होता. त्यामुळेच लोकसभेत तुलनेने कमी जागा निवडून आल्या तरीही ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा लढविण्यावर ठाम आहेत.
 
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंसमोर CM एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं सर्वात मोठं आव्हान आहे. कारण या निवडणुकीत दोन्ही पक्षांचं अस्तित्व हे पणाला लागलं आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर आता दोन्ही शिवसेना या पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

पाहा शिवसेना (UBT)पक्षाची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena (UBT) 1st Candidates List)

 

शिवसेना (UBT) पक्षाची पहिली यादी जाहीर

  1. उन्मेश पाटील - चाळीसगाव

  2. वैशाली सूर्यवंशी - पाचोरा

  3. सिद्धार्थ खरात - मेहकर 

  4. नितीन देशमुख - बाळापूर

  5. गोपाल दातकर - अकोला पूर्व

  6. सिद्धार्थ देवळे - वाशिम

  7. सुनील खराटे - बडनेरा

  8. विशाल बरबटे - रामटेक

  9. संजय देरकर - वणी

  10. एकनाथ पवार - लोहा 

  11. संतोष टारफे - कळमनुरी

  12. राहुल पाटील - परभणी

  13. विशाल कदम - गंगाखेड 

  14. सुरेश बनकर - सिल्लोड

  15. उदयसिंह राजपूत - कन्नड

  16. किशनचंद तनवाणी - संभाजीनगर मध्य

  17. राजू शिंदे - संभाजीनगर प. 

  18. दिनेश परदेशी - वैजापूर

  19. गणेश धात्रक - नांदगाव

  20. अद्वय हिरे - मालेगाव बाह्य

  21. अनिल कदम - निफाड

  22. वसंत गीते - नाशिक मध्य

  23. सुधाकर बडगुजर - नाशिक पश्चिम

  24. जयेंद्र दुबळा - पालघर

  25. विश्वास वळवी - बोईसर

  26. महादेव घाटळ - भिवंडी ग्रामीण

  27. राजेश वानखेडे - अंबरनाथ

  28. दिपेश म्हात्रे - डोंबिवली

  29. सुभाष भोईर - कल्याण ग्रामीण

  30. नरेश मणेरा - ओवळा-माजिवडा

  31. केदार दिघे - कोपरी-पाचपाखाडी

  32. राजन विचारे - ठाणे

  33. एम. के मढवी - ऐरोली

  34. उदेश पाटेकर - मागाठाणे

  35. सुनील राऊत - विक्रोळी

  36. रमेश कोरगावकर - भांडुप पश्चिम

  37. अनंत नर - जोगेश्वरी पूर्व

  38. सुनील प्रभू - दिंडोशी

  39. समीर देसाई - गोरेगाव

  40. ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व

  41. प्रकाश फातर्पेकर - चेंबूर

  42. प्रविणा मोरजकर - कुर्ला

  43. संजय पोतनीस - कलिना

  44. वरूण सरदेसाई - वांद्रे पूर्व

  45. महेश सावंत - माहिम 

  46. आदित्य ठाकरे - वरळी

  47. नितीन सावंत - कर्जत

  48. मनोहर भोईर - उरण

  49. स्नेहल जगताप - महाड

  50. शंकरराव गडाख - नेवासा

  51. बदामराव पंडीत - गेवराई

  52. कैलास पाटील - धाराशिव

  53. राहुल पाटील - परांडा

  54. दिलीप सोपल - बार्शी

  55. अमर पाटील - सोलापूर दक्षिण

  56. दीपक आबा साळुंखे - सांगोला

  57. हर्षद कदम - पाटण 

  58. संजय कदम - दापोली

  59. भास्कर जाधव - गुहागर

  60. सुरेंद्रनाथ माने - रत्नागिरी

  61. राजन साळवी - राजापूर

  62. वैभव नाईक - कुडाळ

  63. राजन तेली - सावंतवाडी

  64. के. पी. पाटील - राधानगरी

  65. सत्यजीत आबा पाटील - शाहूवाडी 

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद अन्...

2019 विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने  भाजपसोबत युतीमध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेने 124 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ज्यापैकी 56 आमदार हे निवडून आले होते. तर भाजपचे 105 आमदार विजयी झालेले. अशावेळी मुख्यमंत्री पदावरून बोलणी फिस्कटल्याने उद्धव ठाकरेंनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीने सत्ता स्थापन करून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद मिळवलं. मात्र, 2022 साली एकनाथ शिंदेंनी पक्षात प्रचंड मोठं बंड केलं. ज्यामुळे उद्धव ठाकरेंना आपलं मुख्यमंत्री पद गमवावं लागलं. 

ठाकरेंचें विश्वासू असलेल्या शिंदेंनी का केलं बंड 

एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचं अत्यंत विश्वासू समजले जात होते. 2019 विधानसभा निकालानंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार समजले जात होते. मात्र, अचानक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याने शिंदेंच्या महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसल्याचं अनेक राजकीय जाणाकार सांगतात. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने एकनाथ शिंदेंचं मातोश्रीवरील वजन कमी झालं होतं. अशातच भाजपने एकनाथ शिंदेंच्या साथीने 2022 साली ठाकरेंचं सरकार पाडून राज्यात शिंदे सरकार स्थापन केलं. 

विधानसभा निवडणूक ठाकरेंसाठी निर्णायक

विधानसभा  निवडणूक 2024 ही उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. आतापर्यंत दोन्ही शिवसेना या आपणच खरी शिवसेना आहोत असा दावा करत आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत कोणत्या शिवसेनेला महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp