Mahayuti : एकीकडे नवाब मलिक, दुसरीकडे प्रदीप शर्मा; 'या' दोन मतदारसंघांवरुन महायुतीत तिढा?

मुंबई तक

• 05:38 PM • 23 Oct 2024

महायुतीमध्ये भाजपने 99, एकनाथ शिंदे यांनी 45 आणि अजित पवार यांनी 38 उमेदवारांची नावांची यादी जाहीर केली आहे.

दोन मतदारसंघावरुन महायुतीत तिढा?

दोन मतदारसंघावरुन महायुतीत तिढा?

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार मलिकांना उमेदवारी देणार?

point

अंधेरी पूर्वमध्ये कुणाला संधी मिळणार?

point

दोन जागांवर महायुतीत एकमत नसल्याचं चित्र


Mahayuti Seat Sharing मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासाठी महायुती आणि मविआच्या नेत्यांमध्ये बैठकांचा सपाटा सुरू आहे. राज्यात यंदा विधानसभेच्या रिंगणात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी, मनसे, वंचित, एमआयएम, परिवर्तन महाशक्तीसह अनेक लहान पक्ष उतरले आहेत. यातील महायुती आणि महाविकास आघाडीत प्रत्येकी तीन मोठे पक्ष आहेत. त्यामुळे सर्वांसमोरच जागा वाटपाचं मोठं आव्हान होतं. या सगळ्या गोंधळात नाराजांची संख्या देखील वाढली आहे. आतापर्यंत भाजपने 99, एकनाथ शिंदे यांनी 45 आणि अजित पवार यांनी 38 उमेदवारांची नावांची यादी जाहीर केली आहे. तर अद्यापही काही जागांवर चर्चा सुरू आहे. ( Mahayuti Clashes for Seats in Andheri east and anushaktinagar)

हे वाचलं का?

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये यंदा प्रत्येकी तीन-तीन मोठे पक्ष असल्यानं जागावाटपाचं मोठं आवाहन सर्व पक्षांसमोर होतं.  महाविकास आघाडीमध्ये अजूनही काही जागांवरुन तिढा असल्यानं कुणीही यादी जाहीर केलेली नाही. तर दसुरीकडे महायुतीतील तिन्ही पक्षांनी पहिली यादी जाहीर केली असली तरी काही जागांवरुन तिढा काय असल्याचं दिसतंय. यातील मुंबईमध्ये असणारे दोन महत्वाचे मतदारसंघ म्हणजे अंधेरी पूर्व आणि अनुशक्तिनगर मतदारसंघ. 


नवाब मलिक यांना उमेदवारी मिळणार?

हे ही वाचा >>Ajit Pawar Candidates List: अजितदादांचा मोठा डाव, NCP ची पहिली यादी आली समोर

 

नवाब मलिक यांचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून अनुशक्तिनगर मतदारसंघाची ओळख आहे. मात्र नवाब मलिक हे पीएमपीएलएशी संबंधीत प्रकरणात आरोपी आहेत म्हणून भाजपचा त्यांना विरोध असल्याचं दिसतंय. अजित पवार सध्या सना मलिक यांना उमेदवारी देण्याच्या तयारी असल्याचं दिसतंय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी तर नवाब मलिक यांना थेट विरोध करत, "आम्ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधीत कुणालाही उमेदवारी देणं मान्य करणार नाही" असं म्हटलंय. तर अजित पवारांची राष्ट्र्वादी नवाब मलिक यांना  शिवाजी नगर-मानखुर्द मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

हे ही वाचा >>CM Eknath Shinde : पहिल्या यादीत नावं नाही, बंडावेळी साथ देणाऱ्या शिंदेंच्या 'या' आमदारांची धाकधूक वाढली

 

 

अंधेरी पूर्व मतदारसंघात कुणाला मिळणार संधी?

 

अंधेरी पूर्वच्या जागेवरूनही वाद कायम असल्याचं दिसतंय. अंधेरी पू्र्व मतदारसंघातून एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. दरम्यान प्रदीप शर्मा हेदेखील अँटिलिया प्रकरणाशी संबंधीत आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवरुन महायुतीमध्ये एकमत होत नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्या अंधेरी पूर्वमधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके आमदार आहेत.मुरजी पटेल हे ऋतुजा लटके यांच्याविरोधात पोटनिवडणुकीसाठी फॉर्म भरला होता, मात्र भाजपने त्यांना नंतर माघार घ्यायला सांगितली होती. त्यामुळे एकूण ही सर्व पार्श्वभूमी पाहता, मुरजी पटेल हे आता माघार घेतील अशा शक्यता कमी आहेत. त्यामुळे, आता या दोन जागांवर नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

  

    follow whatsapp