Shiv Sena Uddhav Thackeray : ठाकरेंनी 'या' नेत्यांना वाटले AB फॉर्म, कोण आहेत 38 उमेदवार?

मुंबई तक

23 Oct 2024 (अपडेटेड: 23 Oct 2024, 08:07 PM)

Shiv Sena Uddhav Thackeray Candidate List : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा आता सुटला आहे. आणि थोड्याच वेळात महाविकास आघाडी आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. अशात आता ठाकरेंनी मात्र आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटून टाकले आहे. मातोश्रीवर आलेल्या 37 उमेदवारांना ठाकरेंनी एबी फॉर्मचे वाटप केले आहेत

maharashtra assembly election 2023 shiv sena uddhav thackeray distribute ab form 37 candidate maha vikas aghadi maharashtra politics

ठाकरेंनी 'या' नेत्यांना वाटले AB फॉर्म

follow google news

बातम्या हायलाइट

point

यादी जाहीर करण्याआधी ठाकरेंनी एबी फॉर्म वाटले

point

या 38 नेत्यांना एबी फॉर्म दिले

point

ठाकरेंनी कुणाकुणाला दिली उमेदवारी?

Shiv Sena Uddhav Thackeray Candidate List : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा आता सुटला आहे. आणि थोड्याच वेळात महाविकास आघाडी आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. अशात आता ठाकरेंनी मात्र आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटून टाकले आहे. मातोश्रीवर आलेल्या 37 उमेदवारांना ठाकरेंनी एबी फॉर्मचे वाटप केले आहेत. त्यामुळे या नेत्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहेत. त्यामुळे हे 37 उमेदवार कोण आहेत?  हे जाणून घेऊयात. (maharashtra assembly election 2023 shiv sena uddhav thackeray distribute ab form 37 candidate maha vikas aghadi maharashtra politics) 

हे वाचलं का?

महाविकास आघाडीतील पक्षाकडून अद्याप उमेदवारी यादी जाहीर झाली नाही आहे. त्याआधीच शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नेत्यांनी एबी फॉर्म वाटप केले आहेत. यामध्ये नुकतेच भाजपला धक्का देऊन ठाकरे गटामध्ये सामील झालेल्या बाळ माने यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून त्याचं तिकीट कन्फर्म समजलं जातंय. 

हे ही वाचा : Amit Thackeray : उपकारांची परतफेड करावी अशी... अमित ठाकरे महायुतीबद्दल काय म्हणाले?

'या' नेत्यांना ठाकरेंनी दिले एबी फॉर्म 

१)सुधाकर बडगुजर - नाशिक पश्चिम
२)वसंत गिते - नाशिक मध्य
३ )अद्वय हिरे - मालेगाव बाह्य
४)एकनाथ पवार - लोहा कंधार
५ )के पी पाटील - राधानगरी विधानसभा
६ )बाळ माने - रत्नागिरी विधानसभा
७) उदेश पाटेकर - मागाठाणे विधानसभा
८ )अमर पाटील - सोलापूर दक्षिण
 ९) गणेश धात्रक - नांदगाव
 १०)दीपक आबा साळुंखे पाटील - सांगोला
११) प्रविणा मोरजकर - कुर्ला 
१२) एम के मढवी - ऐरोली 
१३) भास्कर जाधव - गुहागर 
 १४)वैभव नाईक - कुडाळ
 १५) राजन साळवी - राजापूर लांजा 
 १६) आदित्य ठाकरे - वरळी 
 १७) संजय पोतनीस - कलिना 
१८) सुनील प्रभू - दिंडोशी 
१९) राजन विचारे - ठाणे शहर 
२०) दीपेश म्हात्रे - डोंबिवली 
२१) कैलास पाटील - धाराशिव 
२२) मनोहर भोईर - उरण 
२३) महेश सावंत - माहीम 
२४)श्रद्धा जाधव -!वडाळा 
२५) पाचोरा - वैशाली सूर्यवंशी  
२६) नितीन देशमुख  - बाळापूर 
२७) कन्नड मतदारसंघ  - उदयसिंह राजपूत
२८) राहुल पाटील - परभणी 
२९) शंकरराव गडाख -नेवासा 
३०) सुभाष भोईर  - कल्याण ग्रामीण 
३१) सुनील राऊत - विक्रोळी
३२) रमेश कोरगावकर - भांडुप पश्चिम 
३३) उन्मेश पाटील - चाळीसगाव 
३४) स्नेहल जगताप - महाड 
३५) ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व
३६) राजेंद्र वानखेडे - अंबरनाथ 
३७) अनुराधा नागवडे - श्रीगोंडा
३८) जयश्री शेळके - बुलढाणा

तसेच राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांना मनेसेने माहीम मतदार संघातून विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं होतं. या मतदार संघात ठाकरे उमेदवार देणार नसल्याची चर्चा होती. मात्र या चर्चा आता निष्फळ ठरल्या आहेत. कारण उद्धव ठाकरे यांनी या मतदार संघातून दादर - माहीमचे विभागप्रमुख आणि इच्छुक उमेदवार महेश सावंत यांना एबी फॉर्म दिले आहेत.

हे ही वाचा : Ajit Pawar Candidates List : अजितदादांनी 38 जणांची नावं केली जाहीर, पण कोणत्या विश्वासू आमदारांना दिली संधी?

 

    follow whatsapp