Manoj Jarange : ठाकरे-शिंदेंचा होणार करेक्ट कार्यक्रम? जरांगे म्हणाले, ''मुंबईतल्या 23 जागा पाडणार''

मुंबई तक

• 10:09 PM • 26 Oct 2024

Manoj Jarange : जालन्याच्या अंतरवाली सराटीत जरांगे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, मुंबईत आमची पाडण्याची क्षमता आहे, आमचं तिथे निर्णायक मतदान आहे. त्यामुळे मुंबईत आम्ही 23 च्या आसपास जागा पाडतो असं देखील जरांगे म्हटले आहे.

maharashtra assembly election 2024 manoj jarange udhhav thackeray vs eknath shinde sambhaji raje maharashtra politics

मुंबईत आम्ही 23 च्या आसपास जागा पाडणार आहोत

follow google news

बातम्या हायलाइट

point

 मुंबईत आमची पाडण्याची क्षमता आहे

point

मुंबईत आम्ही 23 च्या आसपास जागा पाडणार आहोत

point

तुमचे लोकांना वेड्यात काढायचे दिवस संपले

Maharashtra Assemblye Election 2024, Manoj Jarange : गौरव साळी, जालना : लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर महायुतीला खुपच भारी पडलेला. त्यावेळी निवडणुक न लढवता जरांगेंनी इतका जोर दाखवला होता. आता विधानसभेला जरांगे प्रत्यक्ष मैदानात उमेदवार उतरणार आहेत. त्यामुळे याचा प्रभाव निवडणुकीवर कसा होणार आहे? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. त्यात आता जरांगेंनी मुंबईत आमची पाडण्याची क्षमता आहे आणि मुंबईत आम्ही 23 च्या आसपास जागा पाडणार आहोत, असे जरांगेंनी म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे-शिंदेंचा होणार करेक्ट कार्यक्रम होण्याचा अंदाज आहे.( maharashtra assembly election 2024 manoj jarange udhhav thackeray vs eknath shinde sambhaji raje maharashtra politics) 

हे वाचलं का?

जालन्याच्या अंतरवाली सराटीत जरांगे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, मुंबईत आमची पाडण्याची क्षमता आहे, आमचं तिथे निर्णायक मतदान आहे. त्यामुळे मुंबईत आम्ही 23 च्या आसपास जागा पाडतो असं देखील जरांगे म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदेंची डोकेदुखी वाढणार आहे. कारण मुंबईत इतर पक्षांच्या तुलनेत ठाकरेच सर्वांधिक उमेदवार उभे करतात. त्यात ठाकरेंच्या जागा त्याच जागांवर शिंदेंचे देखील उमेदवार असतात. त्यामुळे विधानसभेत जरांगे ठाकरे आणि शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Shiv Sena UBT : ठाकरेंनी घोसाळकर कुटुंबीयांना दिला AB फॉर्म, पण उमेदवार ठेवला गुलदस्त्यात

दरम्यान सरकारने शेतकऱ्यांचा एक रुपयात पीक विमा काढला होता, त्याचे पैसे कुठे आहेत असा सवाल मनोज जरांगे यांनी केलाय. सरकारने पीक विम्याचे हफ्तेच भरले नाही असं जरांगे म्हणालेत. शेतकऱ्यांचं कल्याण कसं होणार आहे असा सवाल जरांगेंनी केलाय. चंद्रकांत दादा, तुमचे लोकांना वेड्यात काढायचे दिवस संपले आता; लोकांना सगळं कळतंय असं उत्तर जरांगे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बद्दल विचारलेल्या प्रश्नाला देताना म्हटलंय.

संभाजीराजेंचा जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव 

महाराष्ट्र स्वराज्य पक्ष नोंदणीकृत आहे. आयोगाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. सर्व उमेदवारांना एकच चिन्ह असेल. एबी फॉर्म असणार आहे. त्यामुळे निवडून आलेल्या सर्व आमदारांना पक्षांतर बंदी कायदा व व्हीप लागू होणार आहे. त्यांना कायदेशीर बंधने असणार आहेत. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवार न देता, स्वराज्य पक्षाच्या चिन्हावर हे उमेदवार उभे करावेत असा प्रस्ताव संभाजीराजेंनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांना दिला किंवा अपक्षच उभे करायचे असतील तर मतविभागणी टाळण्यासाठी दोघांनी युती करण्याचाही निर्णय त्यांच्यावर सोपवला आहे असंही संभाजीराजेंनी सांगितले.

    follow whatsapp