Sharad Pawar vs Ajit Pawar: बारामती: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात प्रचाराच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजितदादांची छोटीशी मिमिक्री करत बारामतीमधील निवडणुकीचं चित्रच पालटून टाकलं आहे. पण हा वचपा लोकसभा निवडणुकीतील असल्याचं आता बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीदरम्यान काय झालं होतं?
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंविरोधात उभं केलं होतं. यावेळी पवार कुटुंबातील अनेकांनी शरद पवार यांच्या बाजूने उभं राहायचं असा निर्णय घेतला. ज्यामध्ये आमदार रोहित पवार यांचा समावेश होता.
हे ही वाचा>> Raj Thackeray : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला, राज ठाकरेंचा हल्लाबोल, राणेंचं नाव घेत 'तो' किस्सा सांगितला
यावेळी एका प्रचार सभेत रोहित पवार यांना भाषणादरम्यान, आपले अश्रू अनावर झाले होते. ज्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल करुन अशा गोष्टींना थारा देऊ नका असं आवाहन मतदारांना केलं होतं.
दरम्यान, आता विधानसभेच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी अजित पवारांच्या रडण्याची मिमिक्री करून लोकसभेचा बदला घेतलं असल्याचं बोललं जात आहे.
विधानसभा निवडणुकीत अजितदादा भावुक, शरद पवारांकडून मिमिक्री
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत अजित पवार हे भावुक झाल्याचं दिसून आलं होतं. बारामतीतील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, 'आई सांगतेय फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात... ए पाणी घे... या पद्धतीने जे काही चाललंय.. हे बरोबर नाही.. मग मोठ्या व्यक्तींनी तर त्यामध्ये सांगायला पाहिजे होतं.. आता फॉर्म कोणी भरायला सांगितला.. ते म्हणाले साहेबांनी सांगितला.. म्हणजे साहेबांनी आता आमच्या तात्यासाहेबांचं घर फोडलं का?'
हे ही वाचा>> MVA Seat Sharing : जागावाटपाच्या बैठकीत पटोले, राऊतांमध्ये खडाजंगी झाली? राऊतांचं उत्तर ऐकाच!
'खरं एकोपा राहिला तर पिढ्यानपिढ्या जातात.. तुटायला वेळ लागत नाही (अजित पवारांनी आवंढा गिळला)'
'आज मला सगळ्यांना सांगायचं आहे की, एकंदरीतच आपल्याला आपला विकास करून घ्यायचा आहे. घरातलं भांडण 4 भितींच्या आत झालं पाहिजे.. चव्हाट्यावर आणण्याचं काही कारण नाही.' असं म्हणताना अजित पवार हे भावुक झाल्याचं दिसून आलेलं.
शरद पवारांनी अजितदादांनी केली मिमिक्री
अजित पवारांच्या भाषणानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार मात्र अजित पवारांची मिमिक्री केली.
सहा महिन्यांपूर्वी सुप्रियाची निवडणूक होती. त्यावेळेला सुनेत्रा उभ्या होत्या. भाषण काय होती नेत्यांची? भाषणं होती की साहेब येतील भावनाप्रधान बोलतील, भावनेला हात घालतील तर भावनाप्रधान तुम्ही होऊ नका... भावनाप्रधान होऊ नका... साहेब येतील डोळ्यात पाणी आणतील आणि मत द्या म्हणून सांगतील त्याला कधी तुम्ही हे करू नका, भावनाप्रधान होऊ नका. चांगलं आहे माझ्यासाठी सल्ला दिला. कालच्या सभेमध्ये (शरद पवारांनी केली अजित पवारांची मिमिक्री) हा प्रश्न भावनेचा नाही आहे, हा तत्वाचा आहे विचारांचा आहे.' असं शरद पवार यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT