Jayashree Thorat : ''सुजय मेलेल्या आईचा दुध प्यायलेला नाही, जशास तसं...'', शालीनीताई विखे पाटलांचा इशारा

मुंबई तक

26 Oct 2024 (अपडेटेड: 26 Oct 2024, 04:51 PM)

Shalini Vikhe Patil News : माजी खासदार विखे पाटील यांच्या सभेत भाजप नेते वसंत देशमुख यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानामुळे संगमनेरमध्ये विखे-थोरात यांच्यात वाद पेटला आहे. या विधानावरून आता विरोधकांनी भाजपला घेरण्यास सूरूवात केली आहे.

sujay vikhe patil mother shalinitai vikhe patil reaction on jayashree thorat balasaheb thorat sangmner

शालीनीताई विखे पाटील आक्रमक

follow google news

बातम्या हायलाइट

point

आपण कुणीही बांगड्या भरलेल्या नाही

point

ठोशास ठोशा देण्याचा कर्तव्य आपलं आहे

point

खालच्या पातळीवर आपण कोणीही जाता कामा नये

Shalini Vikhe Patil : माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Wikhe Patil) यांच्या सभेत भाजप नेते वसंत देशमुख यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानामुळे संगमनेरमध्ये विखे-थोरात यांच्यात वाद पेटला आहे. या विधानावरून आता विरोधकांनी भाजपला घेरण्यास सूरूवात केली आहे. अशात आता या वादावर सुजय विखे यांच्या मातोश्री शालीनीताई विखे पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. (sujay vikhe patil mother shalinitai vikhe patil reaction on jayashree thorat balasaheb thorat sangmner)

हे वाचलं का?

चांगलं काम काही लोकांना बघवत नाही. त्यामुळे विघ्न आणण्याचे काम ठराविक मंडळी करत आहे. आपण भाषण करताना काय तारतम्य बाळगेलेला आहे. याचा विचार सुद्धा केला पाहिजे. ते जर खालच्या पातळीवर बोलत असतील, तर सुजय विखे मेलेल्या आईचा दुध प्यायलेला नाही, जशास तसे उत्तर देईल, असा इशारा शालिनीताई विखे पाटील यांनी दिला आहे. तसेच आपण कुणीही बांगड्या भरलेले नाही ठोशास ठोशा देण्याचा कर्तव्य आपलं आहे. 
खालच्या पातळीवर आपण कोणीही जाता कामा नये. वसंतराव देशमुख यांच्याकडून गेलेल्या चुकीच्या शब्दाचा सर्व शिर्डी मतदारसंघातर्फे सुजयने निषेध केलेला आहे. न्यायाधीश या प्रकरणात न्याय देतीलच परंतु इथून पुढे लोणी गावात कोणी वाईट करण्याचा प्रयत्न केलं तर त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा देखील शालीनीताई यांनी दिला आहे. 

हे ही वाचा : Jayashree Thorat: 'तुला सुद्धा पोरं कशी झाली?', थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना विखेंच्या समर्थकाने पातळीच सोडली!

वसंतराव देशमुख यांच्या चुकीच्या वक्तव्याचा आपण निषेध केलेलाच आहे. खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी जे भाषण केलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड आहे. पण सहनशीलतेला सुद्धा काहीतरी अंत असतो.सुजय विखेंचे सर्व भाषण मुद्देसूद असतात, मी आई म्हणून ऐकत असते.....आपल्या मुलाचे तोंडून एकही वाक्य चुकीचे जाऊ नये असे संस्कार आम्ही दिलेले आहे....डोक्यावर पडला म्हणून आरोप करतात परंतु कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नसतं, अशा शब्दात देखील त्यांनी आरोप करणाऱ्यांना सुनावलं आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

संगमनेर येथे सुजय विखे पाटील यांची संकल्प सभा सुरू असताना भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी वादग्रत वक्तव्य केलं. ते म्हणाले, "भाऊसाहेब थोरात यांची नात, ती तर बोलती म्हणत्यात. माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाली? हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. सुजयदादा तिला प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना, सगळ्या तालुक्याला माहिती आहेत", असं वसंतराव देशमुख सभेत म्हणाले.

हे ही वाचा : Jayashree Thorat: "त्यांना सरळ करण्याचं काम...", वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह विधानानंतर जयश्री थोरात संतापल्या

वसंतराव देशमुख यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे. काल रात्री काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीची तोडफोडही केली आहे. राजकीय वर्तुळात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सभा आटोपून परत जाणाऱ्या सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील काही गाड्या अडवल्या गेल्या आणि त्यांची तोडफोड करत चिखली गावाजवळ जाळपोळ करण्यात आली आहे. 

    follow whatsapp