Vidhan Sabha Election Maharashtra : लोकसभा निवडणुकीत मोठा झटका बसल्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याची तयारी भाजपची असून, कोणत्याही परिस्थितीत १५५ ते १६० जागा लढवण्याच्या विचारात आहे, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. लोकमतने याबद्दलचे वृत्त दिले आहे. (BJP is Aiming to contest 155 to 160 Seat in Maharashtra Assembly Election 2024)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यास विलंब झाल्याने महायुतीला मोठा फटका बसला. ती चूक टाळण्यासाठी भाजपने आता जागावाटपावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. शिंदेंच्या शिवसेनेने १०० जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ८० ते ९० जागा मागितल्या आहेत.
भाजपची किती जागा लढवण्याची तयारी?
भाजपच्या नेत्याने सांगितले की, भाजप कोणत्याही परिस्थितीत १५५ ते १६० पेक्षा खाली एकही जागा कमी लढणार नाही.
हेही वाचा >> महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार? भाजपची झोप उडवणारा सर्व्हे
महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या २८८ आहे. त्यापैकी १५५ ते १६० जागा भाजपने लढवल्या तर उर्वरित १२८ ते १३३ जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मागणीप्रमाणे जागा मिळेल याची शक्यता कमी आहे.
हेही वाचा >> ठाकरे म्हणाले, 'मविआ'तून बाहेर पडेन; 'त्या' बैठकीत काय घडलं?
भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही
भाजपमधील सूत्रांनी सांगितले की, एकनाथ शिंदे हेच विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत मुख्यमंत्री असतील. भाजपने कधीही कोणाचे नाव पुढे करून विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही राज्यात लढवलेल्या नाहीत. ज्या राज्यांमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती, अशी राज्ये किंवा मित्रपक्षांसोबत सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये भाजपने निवडणुकीच्या आधी कधीही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही.
ADVERTISEMENT