Matrix Exit Poll : MVA चा निसटता पराभव! राज्यात महायुतीचा झेंडा फडकणार, किती जागा जिंकणार?

मुंबई तक

20 Nov 2024 (अपडेटेड: 20 Nov 2024, 08:07 PM)

Maharashtra Election 2024, Matrix Exit Poll: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार असून राज्यात कोणत्या आघाडीचं सरकार येईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Matrix Exit Poll Latest Update

Matrix Exit Poll Latest Update

follow google news

बातम्या हायलाइट

point

मॅट्रिझच्या एक्झिट पोलने उडवली खळबळ

point

महायुती किती जागा जिंकणार?

point

महाविकास आघाडीच्या पारड्यात किती जागा?

Maharashtra Election 2024, Matrix Exit Poll: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार असून राज्यात कोणत्या आघाडीचं सरकार येईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच महाविकास आघाडी महायुतीबाबत एक्झिट पोलचे खळबळजनक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाला किती जागा मिळतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

हे वाचलं का?

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मॅट्रिझ एक्झिट पोलनुसार भाजपला (89-101), (शिंदे गट 37-45), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार (17-26), काँग्रेस (39-47), शिवसेना ठाकरे गट (21-29) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाला (35-43) जागांवर विजय मिळणार आहे. या मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचं सरकार येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारण या पोलमध्ये महायुतीला 150 ते 170 जागा, मविआला 110 ते 130 जागा आणि इतर पक्षांना 8 ते 10 जागा मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय. 

हे ही वाचा >> Electoral Edge Exit Poll: महायुती सरकारला धक्का! 'इतक्या' जागांवर MVA मारणार बाजी 

अपक्ष आणि लहान पक्ष किंगमेकर ठरणार? 

दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही राज्यातली पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीत कुणाला कौल मिळणार यावरुन अनेकांचं भवितव्य ठरणार आहे. अशातच आज मतदान पार पडलं आणि एक्झिट पोलही समोर आहेत. त्यानसुर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  महायुतीला 122 ते 186 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 69 ते 121 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर 12 ते 29 जागा इतर पक्ष आणि अपक्षांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हे ही वाचा >> Mumbai Assembly Election Voting LIVE Updates: मुंबईत कोण मारणार बाजी? 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

    follow whatsapp