कोणकोणत्या मतदारसंघातून लढायचं याबद्दल बोलत असताना, मनोज जरांगे यांनी आज समर्थकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आज संध्याकाळपर्यंत उमेदवार घोषित करु असं सांगितलं. तसंच त्यांनी आपण ज्याठिकाणी निवडून येणार असेच मतदारसंघ लढू असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. त्यानुसार त्यांनी काही मतदारसंघांतून लढण्यासाठी यादीही घोषित करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला मनोज जरांगे यांनी दोन मतदारसंघांची नावं जाहीर केली आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Mumbai Police : भाजपच्या 'या' मोठ्या नेत्याला धमकी, सिद्दीकींचाही उल्लेख, मुंबई पोलिसांना मेसेज, 10 दिवसांचा अल्टीमेटम,
मनोज जरांगे यांनी आज आपल्या उमेदवारांची घोषणा करताना आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या हक्काचा जिल्ह्यात एकतरी आमदार असावा अशा दृष्टीने बहुतांश जिल्ह्यांमध्ये उमेदवार देणार आहेत. तर इतर ठिकाणी आपल्याला काही लोकांना पाडायचं आहे असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे. त्यानुसार बीडमधील केज आणि जालना जिल्ह्यातील मंठा-परतूर मतदारसंघात लढण्याचं ठरवलं आहे. आज संध्याकाळपर्यंत एकूणच किती मतदारसंघ लढवायचे आणि उमेदवार कोण असणार हे मनोज जरांगे स्पष्ट करणार आहेत. तर आपल्यासोबत असलेल्या इतर समाजासाठीही मनोज जरांगे राखीव जागांवर त्यांना पाठिंबा देणार आहेत.
हे ही वाचा >>Jitendra Awhad: अजित पवार मर्दाची औलाद असते तर... जितेंद्र आव्हाड आक्रमक, 'त्या' घटनेवरुन थेट हल्लाबोल
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अंतरवालीतील उपोषणातून महाराष्ट्राला माहिती झालेल्या मनोज जरांगे यांनी आता थेट राजकारणात एन्ट्री केल्याचं दिसतंय. आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आपण निवडणुकीत उतरणार असं सांगितलं होतं. त्यानुसार मनोज जरांगे आता विधानसभेला आपले उमेदवार उतरवत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शेकडो उमेदवारांच्या मुलाखती घेऊन मनोज जरांगे यांनी त्या उमेदवारांना फॉर्म भरून ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार आता आपण सांगू त्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यायचे आणि जो उमेदवार ठरवू त्याला मदत करायची अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.
ADVERTISEMENT