गेल्या 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी पार पडला असून, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठ्यांनी तुम्हाला 5 जानेवारी 2025 पर्यंत आरक्षण देण्याची संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं करा असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारला नवा अल्टीमेटम दिला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Manoj Jarange : मनोज जरांगे यांचं सरकारला नवं अल्टीमेटम, इशारा देताना महायुतीकडून अपेक्षाही केली व्यक्त
"पूर्वीही तुम्हीच बहुमतात होतात, याच मराठ्यांना तुम्हाला खेटावं लागलं. त्यामुळे 5 जानेवारीपर्यंत आरक्षण देऊन तुम्ही मराठ्यांनी तुम्हाला दिलेल्या संधीच सोनं करायला पाहिजे" असं मनोज जरांगे म्हणाले. मनोज जरांगे यांनी महायुतीकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. तुम्ही मराठ्यांचं मन जिंकायला पाहिजे, तुम्ही मराठ्यांशी द्वेष करताय असं मराठ्यांना आता वाटायला नको, तुम्ही सूड भावनेनं, बदला घेण्याच्या भूमिकेनं मराठ्यांशी वागताय हे आता मराठा समाजात जाऊ देऊ नये असंही पुढे मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगेंचा इशारा
हे ही वाचा >>Sharad Pawar : "एक चांगला सहकारी गमावला...", मधुकर पिचड यांच्या निधनामुळे शरद पवारांचे डोळे पाणावले
मराठ्यांच्या विरोधात पुन्हा गेलात. तर सत्ता चालवणं अवघड होईल. मला उघडं पाडायचा प्रयत्न केला गेला, एकटं पडायचं प्रयत्न केला गेला, माझा समाज हे सहन करत नाहीये असंही जरांगे म्हणाले आहेत. सामूहिक आमरण उपोषणाची तारीख घोषित झाल्यानंतर मराठे अंतरवाली सराटीत कोटींच्या संख्येत दिसतील असं म्हणत जरांगेंनी 5 जानेवारीची नवी डेडलाईन सरकारला दिली आहे.
ADVERTISEMENT