Nilesh Rane On Uddhav Thackeray: राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा 5 डिसेंबरला शपथविधी पार पडल्यानंतर आजपासून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झालीय. विधान भवनात शपथविधीसाठी आलेले आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तळ कोकणापासून रत्नागिरीत महायुतीला भरघोस यश मिळालं आहे. उद्धव ठाकरेंची फक्त एकच जागा निवडून आलेली आहे, यावर प्रतिक्रिया देताना आमदार निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल केला.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंवर टीका करत निलेश राणे म्हणाले, "उद्धव ठाकरेंचा पक्ष हा कोकणातून साफ झालेला आहे. त्यांना आता कोकणात स्थान नाही. ज्या पक्षाने कोकणाला 40 वर्ष मूर्ख बनवलं. लोकांनी त्यांना जागा दाखवली, हे मी लोकसभेलाही म्हटलं होतं. कोकणी माणसाला भावनिक करून जर तुम्ही मतं घेत असाल आणि कोकणी माणसाला आणि त्यांच्या जमिनीला ओसाड ठेवत असाल, तर कधी ना कधी कोकणातील जनता तुमच्यावर वचपा काढणार आणि तो वचपा काढलेला आहे. कोकणातून उद्धव ठाकरेच्या पक्षाला हद्दपार केला आहे".
कोकणातील प्रश्नांबाबत सर्व आढावा मी घेणार आहे. पहिले आमदार म्हणून शपथ घेऊदे. त्यानंतर जे प्रश्न महाराष्ट्राच्या हिताचे आहेत, ते सर्व प्रश्न मी मांडणार आहेत. विरोधक इव्हीएमबाबत अजूनही प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल गांधी मारकडवाडीत येतील, अशी चर्चा आहे. यावर राणे म्हणाले, राहुल गांधी येऊन काय करणार. राहुल गांधी फक्त निगेटिव्ह राजकारण करत आहेत. जगात राहुल गांधी जिथे जिथे जातात, आपल्या देशाची बदनामी करायलाच जातात. हे निगेटिव्ह राजकारण काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी काय नवीन नाही.
हे ही वाचा >> 7 December 2024 Gold Rate: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मुंबईत आज 'इतक्या' रुपयांनी गडगडलं सोनं
दहा वर्षानंतर माझ्या मतदारसंघातील जनतेनं मला ही संधी दिलीय. मी माझ्या मतदारसंघातील, जिल्ह्यातील लोकांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या विधिमंडळात मला त्यांनी संधी दिली, म्हणून त्यांचे आभार मानतो. पण अजून भरपूर काम करायचं आहे. आमदारकीत भारावून न जाता, माझ्यावर जी जबाबदारी आहे, ती पूर्ण करण्यासाठी जे काही करणं भाग आहे, ते निलेश राणे सगळं करणार..
हे ही वाचा >> Vinod Kambli : विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली, पण कपिल देव म्हणाले..
कुडाल-मालवणमधील नेमको कोणते प्रश्न तुम्ही सभागृहात मांडणार आहात? या प्रश्नाचं उत्तर देताना निलेश राणे म्हणाले, मागच्या दहा वर्षात मतदारसंघाला ओसाड पाडण्याचं काम मागच्या आमदारांनी केलं. पण मला त्यांच्यावर टीका करायची नाही. माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. 21 व्या शतकातील मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचं आहे. मी माझं व्हिजन मांडलेलं आहे, त्यानुसारच मी शंभर टक्के काम करण्याचा प्रयत्न करेन. राणे कुटुंबातील दोन सख्खे भाऊ विधानभवनात आहेत, तुमची काय भावना आहे, यावर बोलताना निलेश राणे म्हणाले, 1985 पासून राणे कुटुंब राजकारणात आहे. जवळपास 39 वर्षे झाली, निवडणूक प्रक्रियेत राणे कुटुंब आहे. आता दोन्ही भाऊ आले. दोन्ही भाऊ महाराष्ट्रासाठी काय करू शकतात, ही दाखवण्याची वेळ आहे.
ADVERTISEMENT