Sharad Pawar: "...तेव्हा EVM ची तक्रार नव्हती", शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल! नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

• 06:21 PM • 07 Dec 2024

Sharad Pawar On EVM : ईव्हीएमच्या विरोधात वातावरण निर्मिती असणार आहे, येणाऱ्या काळात नेमकी काय भूमिका असणार आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवारांनी मोठं विधान केलं.

Sharad Pawar On BJP

Sharad Pawar On BJP

follow google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांनी भाजपवर साधला निशाणा

point

"भाजपची अवस्था अतिशय कठीण होती, पण..."

point

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar On EVM : ईव्हीएमच्या विरोधात वातावरण निर्मिती असणार आहे, येणाऱ्या काळात नेमकी काय भूमिका असणार आहे? यावर बोलताना शरद पवार म्हणाले, "यावर आज भाष्य करणं योग्य नाही. ते (विरोधक) म्हणतात, लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा ईव्हीएमची तक्रार नव्हती आणि तुम्ही आताच कसा आक्षेप घेतला. पण आमचं निरिक्षण असं आहे की, 4 निवडणुका आता झाल्या आहेत. हरियाणाच्या निवडणुकांमध्ये भाजपची अवस्था अतिशय कठीण होती. पण भाजप सत्तेवर आली, त्याचवेळी जम्मु काश्मीरमध्ये फारुक अब्दुला यांचा पक्ष आला आणि तिथे काँग्रेसचा पराभव झाला. महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपला यश आलं. पण याचवेळी झारखंडला भाजपचा पराभव झाला. त्यामुळे सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात, दोन निवडणुकीत एक ठिकाणी तुम्ही जिंका. एक ठिकाणी आम्ही जिंकू. त्यामुळे ईव्हीएमचा काही संबंध नाही. त्यामध्ये एकच दिसतंय, मोठी राज्य आहेत, तिथे भाजप आहे".

हे वाचलं का?

पत्रकार परिषदेत शरद पवार पुढे म्हणाले, निवडणुका झाल्यानंतर ज्यावेळी यश मिळतं. तेव्हा उत्साहाचं वातावरण असतं. मला महाराष्ट्रात आता तसं वातावरण दिसत नाही. पण उगीचच आरोप करणं योग्य नाही. माझ्याकडे त्यासंबंधीची अधिकृत माहिती नाहीय. आम्ही फक्त काही आकडेवारी गोळा केलीय. साधारणत: प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला या निवडणुकीत एकंदरीत मतं किती पडली आणि त्यांचे लोक किती निवडून आले? असा सवालही पवारांनी उपस्थित केला.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत 'त्या' महिलांना मिळणार नाहीत 2100? CM फडणवीसांनी केली घोषणा

"काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात 80 लाख मतं आहेत आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले. आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांना (शिवसेनेला) 79 लाख मतं पडली. म्हणजे काँग्रेस पेक्षा 1 लाख कमी आणि त्यांचे 57 लोक निवडून आले. 80 लाख वाल्यांचे 15 आणि 79 लाख वाल्यांचे 57...राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मतं 72 लाख आहेत आणि आमचे दहा उमेदवार निवडून आले. अजित पवार गटाला 58 लाख मतं आहेत आणि त्यांचे 41 उमेदवार निवडून आले. जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य नाही. पण हे मतांचे आकडे मोठे आश्चर्यकारक आहेत", असंही पवार म्हणाले. 

हे ही वाचा >> Aaditya Thackeray : मारकडवाडीचा मुद्दा पेटणार? आमदारांनी शपथच घेतली नाही, आदित्य ठाकरे म्हणाले आता राज्यभर...

    follow whatsapp