Pankaja Munde Appeal to supporter : बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. हे आत्महत्येचे सत्र थांबवण्याचे आवाहन पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी करून देखील ते थांबत नाही. त्यामुळे आज पंकजा मुंडे यांनी चिंचेवाडी येथील वायभासे कुटुंबाला भेट घेतली. या भेटीवेळी पीडित कुटुंबीयांचे सात्वन करताना पंकजा मुंडे यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी या आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल असे पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या या विधानानंतर आतातरी या आत्महत्या थांबतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (pankaja munde appeal to supporter worker otherwise i will leave politics beed suicide)
ADVERTISEMENT
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ''मी मुंडेसाहेबांनतर समाजाला आणि कार्यकर्त्यांना कुटुंबापेक्षाही जास्त जीव लावला. लोकांनीही मला एवढा जीव लावला की, माझ्या पराभवानंतर ते जीव देत आहेत, पण हे मला मान्य नाही. मी स्वतःचं संतुलन कधीही स्वतःचे संतुलन बिघडू दिल नाही. मी कधीही भूमिका कमकुवत घेतली नाही. पण, या आत्महत्येच्या घटनांमुळे मी कमकुवत झाली आहे. मला खूप अपराधी वाटत आहे. कारण, माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला मी काहीच देऊ शकत नाही,'' अशा शब्दात पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे ही वाचा : कीर्तिकरांना मतमोजणी केंद्रावरील CCTV फुटेज का दिले नाही?
मला वाटतं की इतकं प्रेम कोणत्याच नेत्यावर कोणी करू नये की, त्यांनी त्याच्यासाठी स्वतःचा जीव द्यावा. जर तुम्हाला हिंमतीने लढणारा नेता हवाय तर मला सुद्धा हिंमतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे. नाहीतर मी राजकारण सोडून देईन, अजून जर कोणी जीव दिला तर. कारण, राजकारणामुळे हे होतंय असं मला वाटतं, असे म्हणत पंकजा मुंडेंनी समर्थकांना आवाहन केलं आहे.
पराभवाने विजयाने मी हरणारी नाही, पण अशा गोष्टी मला हादरून टाकतात. हे प्रसंग पाहून मी स्व:त खूप अस्वस्थ आहे. आत्महत्या करायला खूप हिंमत लागते, तुम्ही ती हिंमत पुढचे शंभर दिवस माझ्यासाठी द्या, आपण सगळं पुन्हा उलटून दाखवू, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT