PM Modi slams Aghadi alliance at Dhule rally : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी धुळ्यामध्ये होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना एक घोषणा दिली. एक है तो सेफ है अशी घोषणा देत काँग्रेसच्या खतरनाक खेळाला अयशस्वी करायचं आहे असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. उत्तर भारतात योगींनी 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा दिली होती. काहीशी त्याच अर्थाची पण एक वेगळी घोषणा आता पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात दिली आहे. त्यामुळे आता विरोधक यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस पुन्हा 370( Article 370) कलम लागू करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे दलित आणि वंचितांना त्यांचे अधिकार मिळणार नाही असा दावा मोदींनी केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Chhagan Bhujbal : ईडीपासून मुक्तिसाठी भाजपसोबत... भुजबळ काय म्हणाले? राजकीय वर्तुळात खळबळ का माजली?
जिथे विभाजनाची आग आहे, तिथे काँग्रेसचा देशविरोधी हात आहे असं मोदी म्हणाले. यांचं उदाहरण म्हणजे, काँग्रेसने काश्मिरला कलम 370 च्या माध्यमातून देशापासून वेगळं ठेवलं. बाबासाहेब आंबेडकरांचं(Baba Saheb Ambedkar) संविधान काश्मीरमध्ये लागू होऊ दिलं नाही, मात्र मोदी आल्यावर बाबासाहेबांचं संविधान काश्मीरमध्ये लागू झालं. त्यामुळे काश्मीरमध्ये दलितांना वंचितांना त्यांचे अधिकार मिळाले नाही. कलम 370 संपवून आम्ही काँग्रेसने निर्माण केलेले प्रश्न संपवून टाकलेत असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीने जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370( J&k Article 370) लागू करण्याचा प्रस्ताव पारीत केला आहे. मात्र देश हे मान्य करेल का? असा सवाल मोदींनी यावेळी केला. जम्मू काश्मीरच्या विधानसभेत याचा भाजप आमदारांनी विरोध केला, तेव्हा त्यांना बाहेर काढून देण्यात आलं. काँग्रेसने पारीत केलेलं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू होऊ देणार नाही. तेच काँग्रेस आणि आघाडी महाराष्ट्रात कोऱ्या कागदांची संविधानाची खोटी प्रत दाखवतात असं म्हणत मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT