Raj Thackeray Exclusive Interview : राज ठाकरे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरले असून, स्वत:अमित ठाकरे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडून गेल्या. काही महिन्यांपूर्वी महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठींमुळे राज ठाकरे महायुतीसोबत जाणार अशी चर्चा होती. मात्र राज ठाकरे यांनी उमेदवार दिल्यानंतर अनेक समीकरणं बदलली. खुद्द अमित ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांनी उमेदवारी दिली. त्यानंतर बराच काळ वेगवेगळ्या राजकीय शक्यता वर्तवल्या गेल्या, मात्र अखेर सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही. तेव्हापासून शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात अंतर निर्माण झाल्याचं दिसतंय. आज राज ठाकरे यांनी 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या एका विधानामुळे ते पुन्हा अधोरेखित झालं. (Raj Thackeray Exclusive Interview on Mumbai Tak)
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Manoj Jarange : कुणाला पाडायचं ते जरांगेंनी स्पष्ट सांगितलं, पत्रकार परिषदेत काय काय मुद्दे मांडले?
अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका भाजप नेत्यांनी घेतली होती, पण महायुतीमधील इतर पक्षांकडून म्हणजेच विशेषत: शिवसेनेकडून तसा प्रतिसाद मिळाला नाही. याबद्दल राज ठाकरे यांना सवाल केला असता राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "तुम्ही उमेदवार देणार नसाल, तर मी अमितला उभं करेन अशी माझी अटच नव्हती. मी अमितचं नाव घोषित केलं होतं. आमच्या एका बैठकीत काही नेत्यांनी भांडूपमधून लढवण्याचं सूचवलं होतं. मग मी अमितला विचारलं की, तू सिरीयस आहेस का? त्यावेळी मी त्याला म्हटलं की जिथे तु वाढलाय तिथे, दादर-माहिमध्ये निवडणूक लढ. त्याने किनारा साफ करण्याची वगैरे कामंही केली. आम्ही पहिल्या यादीत नाव घोषित केल्यावर हे सर्व सुरू झालं.समोरच्यांना वाटत असेल की, त्यांनी उमेदवार देऊ नये तर ते त्यांच्या मनाने करावं. तुम्हाला वाटत असेल तर करा, नाहीतर नका करू, ही जबरदस्ती होऊ शकत नाही. मी महायुतीतला घटक नाही, लोकसभेला पाठिंबा दिला होता वगैरे गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला हव्या होत्या, मी नाही." हा सर्व घटनाक्रम सांगताना राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधातही आम्ही उमेदवार दिला नव्हता याचीही आठवण करुन दिली.
तुमची पहिली निवडणूक, माझी पाचवी...
पुढे बोलताना एकनाथ शिंदेंकडून आलेल्या "भांडूपच्या ऑफरबद्दल विचारलं असता, राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही मला का ऑफर करता? तुमची पहिली निवडणूक आहे, माझी पाचवी निवडणूक आहे, सत्तेत बसलात म्हणून तुम्ही मला ऑफर नाही देऊ शकत" असं म्हणत राज ठाकरेंनी रोखठोकपणे आपली भूमिका मांडली. एकूणच राज ठाकरेंच्या या भूमिकेवर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT