Raosaheb Danve And Arjun Khotkar Viral Video: शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आणि भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात लोकसभा निवडणुकीनंतर दुरावा निर्माण झाला होता. परंतु, या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा दिलजमाई झाल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. आता विधानसभा निवडणुकीत आपण एकमेकांना मदत करू, असं दानवे आणि खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. मात्र, रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकरांचं स्वागत केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. दानवेंनी एका व्यक्तीला लाथ मारल्याचं या व्हिडीओत दिसत आहे, त्यामुळे नेटकऱ्यांनी दानवेंचा चांगलाच समाचार घेतल्याचं एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दानवे आणि खोतकर यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. परंतु, नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडीओत दानवे पुष्पगुच्छ देऊन खोतकरांचं स्वागत करत असल्याचं समोर आलं आहे. पण हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी दानवेंना चांगलच सुनावलं आहे. सिद्धेश पाटील नावाच्या यूजरने दानवे आणि खोतकरांचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, रावसाहेब दानवे हा माज बरा नव्हे..फोटो काढताय तो पण तुम्ही एका गद्दारासोबतच हे लक्षात ठेवा...''सामान्य जनतेला अशी लाथ मारणे चांगले नाही. लोकसभेचा माज अजून उतरलेला दिसत नाही.
हे ही वाचा >> Abhishek-Aishwarya: अभिषेक-ऐश्वर्याने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज! घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नेमकं काय घडलं?
इथे पाहा व्हिडीओ
अर्जुन खोतकर महायुतीकडून जालना विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. तर रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ भास्करराव यांनीही याच मतदासंघात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र, दानवेंनी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. दानवे आणि खोतकर यांच्यात अनेक दिवसांपासून वैर होतं, दोन्ही नेत्यांमध्ये अचानक मैत्रीचे धागे कसे जुळले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा >> Mahim Viral Video : "आमच्या दरवाज्यातून निघ...", महिलांनी सदा सरवणकरांंना थेट सुनावलं!
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानवे आणि खोतकर यांच्यात दोन तास चर्चा झाली. झालं गेलं विसरून जाऊन नव्याने एकमेकांना साथ देऊ अशी भूमिका यावेळी दोन्ही नेत्यांनी घेतल्याचं बोललं जात आहे. मागील निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी दोन्ही नेत्यांनी राजकीय विषयावर खलबतं केली.
ADVERTISEMENT