Dombivali Crime News: डोंबिवलीतील प्रसिद्ध रीलस्टार सुरेंद्र पाटीलवर आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. तीन दिवसांपूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात 19 वर्षीय तरुणीने सुरेंद्र पाटीलविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. एका घटस्फोटीत महिलेने वारंवार बलात्काराचा केल्याच्या आरोप करत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुरेंद्र पाटीलवर गुन्हा दाखल झाला. या गंभीर प्रकरणात ठाणे खंडणी विरोधी पथकांनी आरोपी सुरेंद्र पाटीलला नाशिक मधून अटक केली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूर्ली येथील रहिवासी सुरेंद्र पाटीलच्या एका गाळ्यात पीडित महिलेने व्यवसाय सुरू केला होता. महिला कागदी प्लेट बनवून आपला उदरनिर्वाह करत होती. परंतु,व्यवसायात नुकसान झाल्याने तो बंद करावा लागला. महिलेला आपल्या मशिनरीजची परतफेड हवी असल्याने ती मशिनरी घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाटीलने मशिनरी परत देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.
हे ही वाचा >> Maharashtra Weather : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पडणार पावसाच्या हलक्या सरी! 'या' ठिकाणी घोंगावणार सोसाट्याचा वारा
आरोपी सुरेंद्र पाटीलच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
तसेच तीन दिवसांपूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात 19 वर्षीय तरुणीने सुरेंद्र पाटीलविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. कल्याण डोंबिवलीतील महात्मा फुले कोळसेवाडी मानपाडा आणि रामनगर मध्ये आरोपी सुरेंद्र पाटील विरोधात 14 गुन्हे दाखल असून तो फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. पोलिसांनी आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याचा शोध घेतला. तो नाशिकच्या एका हॉटेलमध्ये लपून बसला होता. त्यानंतर इंदीरानगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांच्या मदतीने खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी नाशिकच्या हॉटेलमधून आरोपीला ताब्यात घेतले.
कोण आहे सुरेंद्र पाटील?
सुरेंद्र पाटील हा एक सोशल मीडिया influencer आणि रील्स स्टार म्हणून ओळखला जाते, ज्याने आपल्या स्टायलिश आणि अनोख्या रील्स व्हिडिओंद्वारे अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली होती. तो मूळचा डोंबिवलीमधील असून, त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहेत.
मात्र, अलीकडेच सुरेंद्र पाटील याचे नाव गंभीर गुन्ह्यांशी जोडले गेले आहे. एप्रिल 2025 मध्ये प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, त्याच्यावर बलात्कार आणि इतर गुन्ह्यांचे आरोप आहेत. ठाकुर्ली (डोंबिवली) येथे एका तरुणीवर "नोकरी लावतो" असे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासह, त्यांच्यावर एकूण 14 विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
काही वृत्तांनुसार, तो बांधकाम व्यवसायाशीही संबंधित होता, परंतु त्याची खरी ओळख सोशल मीडियावर रील्स स्टार म्हणूनच निर्माण झाली. त्याच्या व्हिडिओंमध्ये तो स्टायलिश कपडे, आत्मविश्वास आणि वेगळ्या संकल्पना दाखवत असत, ज्यामुळे तरुणांमध्ये तो लोकप्रिय झालेला.
काही व्हिडिओंमध्ये त्याने पोलिसांच्या खुर्चीत बसून रील्स बनवले होते, ज्यामुळे तो याआधीही वादात आला होता. त्याच्या चाहत्यांमध्ये त्याचे व्यक्तिमत्त्व आणि स्टाइल याचे कौतुक होत असे.
हे ही वाचा >> Personal Finance: तुम्हाला 2 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळतील, पोस्ट ऑफिसची मस्त योजना...
ADVERTISEMENT
