Riteish Deshmukh : धर्म वाचवा म्हणणाऱ्यांचा पक्ष धोक्यात... रितेश देशमुख तुफान बरसले, भाषणाची चर्चा

Retiesh Dehmukh Latur Speech : लातूरमध्ये धिरज देशमुख यांच्या प्रचारासाठी काँग्रेसची सभा पार पडली. या सभेत रितेश देशमुखने चांगलीच फटकेबाजी केली. 

Mumbai Tak

मुंबई तक

11 Nov 2024 (अपडेटेड: 11 Nov 2024, 12:41 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लातूरमध्ये रितेश देशमुख यांची फटकेबाजी

point

धिरज देशमुखांची प्रचार सभा रितेशने गाजवली

point

धर्माचं नाव घेऊन प्रचार करणाऱ्यांवर निशाणा

Riteish Deshmukh : धर्माचं नाव घेऊन प्रचार करणाऱ्या पक्षांवर अभिनेता रितेश देशमुखने निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतोय, तसतसा प्रचाराचा जोरही वाढत जातोय. सगळेच पक्ष सध्या दंड थोपटून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. नेते मंडळींच्या भाषणांमधून रोज एकमेकांवर टीकांचा पाऊस पडतोय. त्यातच आता रितेश देशमुखच्या भाषणाची चांगलीच चर्चा होतेय. लातूरमध्ये धिरज देशमुख यांच्या प्रचारासाठी काँग्रेसची सभा पार पडली. या सभेमध्ये धिरज देशमुख यांचे बंधू आणि प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखही उपस्थित होता. यावेळी रितेश देशमुखने चांगलीच फटकेबाजी केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Maharashtra Vidhan Sabha : राज्यात महायुती पुन्हा बाजी मारणार? मविआला किती जागा मिळणार? : IANS सर्व्हे

विधानसभेच्या प्रचाराला चांगलीच धार आली असून, महायुती आणि महाविकास आघाडीच्या पक्षांची फौज सध्या मैदानात उतरली आहे. त्यातच आता आपल्या भावाच्या निवडणूक प्रचारासाठी रितेश देशमुखही मैदानात आहेत. काल लातूरमध्ये प्रचार करताना रितेश देशमुखने धर्माचं नाव घेऊन प्रचार करणाऱ्या पक्षांवर हल्लाहोल केला आहे. 

काय म्हणाला रितेश?

प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे. धर्माला वाचवा, धर्म बचाव...अहो आमचा धर्म आहे, आमचा धर्म प्रिय आहे. प्रत्येक व्यक्तिला आपला धर्म प्रियच आहे. जे लोक म्हणतायत तुम्हाला, धर्माला वाचवा, धर्म धोके मे हैं, खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करतायत, की आमचा पक्ष धोक्यात आहे, तुम्ही आम्हाला वाचवा.

रितेश देशमुख यांच्या या भाषणाची सध्या  चांगलीच चर्चा होतेय. या सभेला जमलेली गर्दी म्हणजे धिरज देशमुखांनी केलेल्या कामाची पावती आहे. विरोधातले पक्ष नेहमीच तुम्हाला येण्याची ऑफर देतात, ती पावती आहे तुमच्या कामाची. तसंच विलासराव देशमुख यांचा स्वाभिमान राखण्याचं काम धिरज देशमुख करत आहेत. याचा मला अभिमान आहे असं रितेश म्हणाला. तसंच पुढे रितेश म्हणाला की, एवढ्या जोरात बटन दाबा की, विरोधकांचं पुढच्यावेळचं डिपॉझिट आताच जप्त झालं पाहिजे. लोकसभेला आपलं वारं होतं, आता झापूक झुपूक वारं आहे आणि विरोधकांकडे गोलीगत धोका आहे असं म्हणत रितेशने डायलॉगबाजी केली. 

 

    follow whatsapp