Bhaskar Jadhav Criticized Amit Shah: मुंबई: शिवसेना (UBT)च्या मुंबईतील दसरा मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जहरी शब्दात टीका केली आहे. याशिवाय राज्यातील शिंदे सरकारवर देखील बोचरी टीकाही केली आहे. पाहा दसरा मेळाव्यात भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले. (shiv sena ubt dussehra melava mla bhaskar jadhav compares amit shah with afzal khan makes venomous criticism)
ADVERTISEMENT
आपल्या भाषणात भास्कर जाधव यांनी गृहमंत्री अमित शाह यांचं नाव न घेता थेट अफजलखानाशी तुलना केली आहे.
हे ही वाचा>> Aditya Thackeray : ''आणि म्हणून...आणि म्हणून...'', आदित्य ठाकरेंनी केली CM शिंदेंची मिमिक्री
भास्कर जाधवांची गृहमंत्री अमित शाहांवर जहरी टीका
दसरा मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, 'सरकार नवनव्या घोषणा करतंय.. पण माझ्या महिला भगिनींना माहिती आहे की, हे लबाड लोकं आहेत. हे विश्वासघातकी लोकं आहेत. हे विश्वासघाताने सत्तेवर आले आहेत. हे आमचा देखील विश्वास घात करतील. आमच्या महिला भगिनींना माहिती आहे की, 2014 साली 15 लाख देणार होते ते आता 1500 रुपये देतात.. भाऊ पक्के लबाड आहेत.'
'400 रुपयांचा सिलेंडर 1200 रुपयांवर नेला आणि गेल्या वर्षी पंतप्रधानांनी मोठं भाषण केलं आणि सांगितलं की, आम्ही भाऊबीज देत आहोत. दहा वर्ष 1200 रुपयांप्रमाणे पैसे घेतले आणि 200 रुपये भाऊबीज दिली. म्हणून यांना माहिती आहे की, भाऊ लबाड आहे.'
हे ही वाचा>> Sushama Andhare : ''सरसंघचालक साहेब देवेंद्रजींचे कान उपटा'', दसरा मेळाव्यात अंधारे कडाडल्या!
'महिलांनी 1500 आपल्या खात्यावर ठेवलेले नाहीत. तर सगळ्यांनी काढून घेतले आहेत. कारण त्यांना माहिती आहे की, हे भाऊ लबाड आहेत. हे भाऊ चोर आहेत. हे त्यांना माहिती आहेत.'
'या देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांनी 15 दिवसांपूर्वी पुण्यात भाजपचा एक मेळावा घेतला. खरं तर मघाशी इथे चांगला पोवाडा झाला. मी पण थोडासा पोवाडा म्हणणार होतो. अफजल खानाच्या वधाच्या वेळेसचा.. खान डुलत डुलत आला.. असा तो पोवाडा आहे की नाही..'
'तसा हा गुजरातचे खान इथे येतात आणि उद्धव साहेबांना म्हणतात की हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत. देशाचा गृहमंत्री सांगतो विरोधकांना रस्त्यावर ठोकून काढा. यांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित आहे?' असं म्हणत भास्कर जाधवांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT