Shivadi Vidhan Sabha : शिवडीच्या जागेचा मुद्दा शिगेला? अजय चौधरी की सुधीर साळवी? 'या' नेत्याचं पारडं जड

मुंबई तक

24 Oct 2024 (अपडेटेड: 24 Oct 2024, 08:46 AM)

शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी की सुधीर साळवी? हा सवाल सध्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासमोर निर्माण झालेला आहे. पक्षाने कालच आपल्या 65 उमेदवारांची यादी जाहीर केली खरी. मात्र उरलेल्या जागांचा प्रश्न अजूनही सुटलेला दिसत नाही.

शिवडी मतदारसंघात रस्सीखेच

शिवडी मतदारसंघात रस्सीखेच

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिवडी विधानसभा मतदारसंघावरुन ठाकरे गटात वाद?

point

सुधीर साळवी की अजय चौधरी? कुणाला उमेदवारी?

point

मातोश्रीवर झालेल्या बैठकांमध्ये अखेर काय ठरलं?


राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले असून, त्यासाठी सगळेच पक्ष मोठ्या ताकदीनं मैदानात उतरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त होतेय, ती जागावाटपाची. आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपासाठी कित्येक दिवसांपासून जागा वाटपासाठी बैठकांचा सपाटा सुरू होता. अखेर काही जागा वगळता बहुतांश जागांचा विषय मार्गी लागला आहे. मात्र अद्यापही काही जागा या निकाली निघालेल्या नाहीत. तसंच अनेक ठिकाणी एकाच पक्षातून दोन इच्छूक असल्यानं तिकीट कुणाला द्यायचं यावरुन पक्षासमोर सुद्धा पेच निर्माण झाला आहे. मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे पक्षाकडून तिकीट घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे या मतदारसंघात बाजी कोण मारणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे. ( Shivadi Vidhan Sabha Conflicts in Shiv Sena Uddhav Thackeray for Ajay Chaudhari and Sudhir salvi)

हे वाचलं का?



हे ही वाचा >> Eknath Shinde: 33 आमदार, 9 नवखे आणि 3 अपक्ष... CM शिंदेंनी एका दगडात किती पक्षी मारले?

 

विद्यमान आमदार अजय चौधरी की सुधीर साळवी? हा सवाल सध्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासमोर निर्माण झालेला आहे. पक्षाने कालच आपल्या 65 उमेदवारांची यादी जाहीर केली खरी. मात्र उरलेल्या जागांचा प्रश्न अजूनही सुटलेला दिसत नाही. मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातूनही यंदा उमेदवारी कुणाला मिळणार याकडे शिवसैनिकांसह सर्वांचंच लक्ष लागून आहे. लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी हे या मतदार संघात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. तर विद्यमान आमदार अजय चौधरीही आपला दाव्यावर कायम आहेत. त्यामुळे या मतदारसंघावरु मातोश्रीवर गेल्या अनेक दिवसांपासून बैठका सुरू आहेत. मध्यंतरी दोन्ही इच्छूक उमेदवारांनी माघार घेण्याचा प्रस्ताव धुडकावला अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. 

सुधीर साळवी यांचं पारडं जड? 

 

हे ही वाचा >>Shiv Sena UBT 1st List: ठाकरेंच्या पहिल्याच यादीत 65 नावं, तुमच्या मतदारसंघात Shiv Sena UBT चा कोण उमेदवार?

 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर अजय चौधरी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबल्यानं त्यांच्या निष्ठेमुळे मातोश्रीवर त्यांना महत्वाचं स्थान आहे. मात्र दुसरीकडे सुधीर साळवी यांचं राजकीय वजन चांगलंच वाढलंय. सुधीर साळवी गेल्या तीन दशकांपासून या मतदारसंघात शिवसेनेचा गड कायम राखण्यासाठी धडपडणारे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. तसंच या मतदारसंघात असलेल्या लालबागचा राजा मतदारसंघाचे ते सचिव असल्यानं त्यांचे बडे उद्योगपती, सिने जगतातील कलाकार यांच्यासह अनेक मोठ्या हस्तींसोबत थेट संबंध आहेत. तसंच या मतदारसंघातील बहुतांश शाखाप्रमुखही सुधीर साळवी यांच्या बाजून उभे असल्याचं कळतंय. त्यामुळे सुधीर साळवी यांना उमेदवारी मिळण्याचे चिन्ह आहेत.

    follow whatsapp