Shivdi Vidhan Sabha : ये दोस्ती हम नहीं तोडेंगे... मनसे आणि ठाकरेंच्या उमेदवाराच्या भेटीची चर्चा

मुंबई तक

17 Nov 2024 (अपडेटेड: 17 Nov 2024, 11:49 AM)

नेत्यांकडून आपल्या विरोधी उमेदवारांवर आखपाखड होताना दिसतेय. एकमेकांवर टीका करताना नेत्यांची जीभ घसरताना दिसतेय. पण शिवडीमध्ये सकारात्मक चित्र दिसलं.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

बाळा नांदगावकर, अजय चौधरींच्या भेटीची चर्चा

point

शिवडी मतदारसंघात विरोधी उमेदवारांच्या भेटीचा व्हिडीओ

point

बाळा नांदगावकर काय म्हणाले?

Shivdi Vidhan Sabha Elections : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहेचण्यासाठी उमेदवारांकडून शक्य त्या पर्यायाचा वापर केला जातोय. जसजसा मतदानाचा दिवस जवळ येतोय, तसा नेत्यांच्या प्रचार सभांमध्ये भाषणांची धारही वाढत जातेय. नेत्यांकडून आपल्या विरोधी उमेदवारांवर आखपाखड होताना दिसतेय. एकमेकांवर टीका करताना नेत्यांची जीभ घसरताना दिसतेय. त्यातच आता मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघात मात्र काहीसं सकारात्मक चित्र पाहयला मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे, दुसरीकडे शिवडीमध्ये चित्र एकदम उलटं आहे.

हे वाचलं का?

 

हे ही वाचा >>Vidhansabha Election 2024: मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्याच पाठीत खंजीर खुपसला: प्रियंका गांधी

 

शिवडी विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा निवडणुका घोषित झाल्यापासून चर्चेत आहे. या मतदारसंघात उद्धव ठाकरेंकडून कुणाला संधी मिळणार? बाळा नांदगावकर यांच्याविरोधात महायुती उमेदवार देणार का? अशा वेगवेगळ्या प्रश्नांमुळे हा मतदारसंघ चर्चेत होता. आता मात्र आणखी एका गोष्टीमुळे हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी आणि मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यातली मैत्री दाखवणारा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. 

राज्यभरात सध्या तुळशी विवाहाच्या कार्यक्रमांचं मोठ्या उत्साहात आयोजन केलं जातंय. अशातच मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये एका ठिकाणी आयोजित तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन्ही उमेदवार एकत्र आल्याचं दिसलं. दोघेही अगदी हसत खेळत एकमेकांच्या बाजूला बसून नागरिकांशी संवाध साधताना दिसले. 

 

हे ही वाचा >>Nagpur : निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये 14 कोटींचं सोनं जप्त, गुजरातहून आणल्याची माहिती

 

"माझी निशाणी रेल्वे इंजिन, त्यासाठी मी आग्रह धरणार, त्यांच्या निशाणासाठी ते आग्रह धरणार. शेवटी ठरवायचंय तुम्हाला! आम्ही एकमेकांसमोर उभे असलो तरी दुश्मन नाही, दोघांनीही एकाच पक्षात काम केलंय. त्यांच्या मला शुभेच्छा आणि माझ्याही त्यांना शुभेच्छा" आहेत असं बाळा नांदगावकर म्हणाले. एकूणच विखारी प्रचारादरम्यान असा एक व्हिडीओ समोर आल्यानं दोघांचंही चांगलंच कौतुक होतंय.

    follow whatsapp