Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी, 'त्या' पत्रात नेमकं काय म्हटलंय?

मुंबई तक

09 Dec 2024 (अपडेटेड: 09 Dec 2024, 09:17 PM)

Aditya Thackeray Latest News: राज्याच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय.

Aditya Thackeray Latest News

Aditya Thackeray Latest News

follow google news

बातम्या हायलाइट

point

आदित्य ठाकरेंनी सीएम देवेंद्र फडणवीसांना लिहिलं पत्र

point

आदित्य ठाकरेंच्या पत्रात नेमकं काय?

point

आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

Aditya Thackeray Latest News: राज्याच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, "आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. बेळगावला केंद्रशासित करा, असा ठराव त्यांनी आजच्या अधिवेशनात मांडला असता आणि तो केंद्राकडे पाठवला असता, तर आम्ही एकमताने तो मंजूर करण्यासाठी त्यांना मदत केली असती. कारण हा ठराव महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राची जनता पाहत आहे. बेळगावमधील मराठी जनताही पाहत आहे. तिकडचे जे स्थानिक मराठी लोक आहेत, ते तर हिंदूच आहेत ना. मग इथे येऊन आम्हाला बटेंगे तो कटेंगे असं सांगतात मग ते जातात कुठे...ती जनताही हिंदूच आहे. मग त्यांच्यावरचा एवढा अन्याय का सहन करतोय आपण? या देखील प्रश्नाचं भाजपने उत्तर देणं गरजेचं आहे". 

हे वाचलं का?

विधानसभा अध्यक्षानंतर राज्यपालांच्या भाषणावर बहिष्कार घातला आहे, यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, "आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यपालांच्याही भाषणावर बहिष्कार टाकला होता. त्याचं कारण एकच आहे की, गेल्या दहा पंधरा दिवसात ज्या घडामोडी आहेत, त्याची राज्यपालानींही चाचपणी करावी, याची आम्हाला अपेक्षा होती. हे बहुमत ईव्हीएमचं आहे की जनतेचं आहे..तसच काही अशेही दिवस होते की, जिथे राष्ट्रपती राजवट लागले किंवा त्यांना बोलावलं जाईल. कुठेही कायद्याचं पालन न करता, निमंत्रण पत्रिका छापल्या गेल्या. राज्यपालांकडे न जाता तारीख पक्षाकडून सांगितली गेली. हा राज्यपालांचाही अपमान होता".

हे ही वाचा >> Uday Samant: "ईव्हीएममध्ये घोळ..."; विधानसभा अध्यक्षांची निवड होताच उदय सामंत 'हे' काय बोलून गेले

"बेळगावमध्ये मराठी जनतेवर अन्याय होतोय, असं असताना राज्यपालांनी त्यांच्या भाषणात फक्त एकच ओळीत सांगितलं की, आम्ही शिक्षणावर खर्च करत आहोत. पण हा खर्च कुणावर केलेला आहे, किती केलेला आहे? किती लोकांना मदत झाली आहे? स्थानिक जनतेला मदत झालीय की नाही? आधीचे घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगत होते, आम्ही तिथे विकास निधी देऊ, नोकऱ्या  देऊ. महाराष्ट्रातच देऊ शकले नाहीत. पण तिथेतरी काय दिलंय का? यावर कुठेही उत्तर आलं नाही. जास्तकरून केंद्राच्याच योजना सांगत आल्या आहेत. हे सरकार नक्कीच कोणाचं आहे? जनतेनं निवडलं आहे की निवडणूक आयोगाने निवडलं आहे? याचं उत्तर आम्हाला अजूनही मिळालं नाहीय", असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा >> Pune Accident: पायलट होण्याआधीच काळाने घातली झडप! कार चालवताना 'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली अन्...

    follow whatsapp