Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Sion Koliwada Constituency: मुंबई: लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) यांना मुंबईत फारसं यश मिळालं नाही. मुंबई दक्षिण-मध्य ही हक्काची समजली जाणारी जागा शिंदे गटाने गमावील. पण याचवेळी लोकसभा मतदारसंघातील सायन-कोळीवाडा या विधानसभा मतदारसंघात भाजपने त्यांची कामगिरी चोख बजावल्याचं पाहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने महायुतीच उमेदवार राहुल शेवाळे यांना मताधिक्य दिलेलं. (sion koliwada vidhan sabha election 2024 analysis of result and impact bjp mahayuti mla r tamil selvan)
ADVERTISEMENT
सायन-कोळीवाडा विधानसभा हा मतदारसंघा मागील काही वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला समजला जात आहे. इथले भाजपचे आमदार आर. तमिळ सेल्वन यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. त्यामुळे भाजपचा हा गड आगामी विधानसभा निवडणुकीत मविआ सर करू शकतं की नाही याचा अंदाज आम्ही डेटाच्या माध्यमातून वर्तविणार आहोत.
हे ही वाचा>> Vidhan Sabha Election 2024: धारावीचा पेपर सोपा, पण विधानसभेला उमेदवार कोण
मुंबई दक्षिण मध्य मतदारासंघातील शिवसेना (UBT)चे उमेदवार अनिल देसाई सावंत यांनी 53 हजार 384 मतांनी विजय मिळवला. तर शिवसेना (शिंदे गट) उमेदवार राहुल शेवाळे यांना 3,41,754 मतं मिळाली होती. या निकालामुळे काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडलंय, हे आपण समजून घेऊया.
मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) आणि शिवसेना (शिंदे गट) अशी थेट लढत झाली. शिवसेनेने (शिंदे गट) महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल शेवाळेंना तिकीट दिलं होतं. तर शिवसेना (UBT)ने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अनिल देसाईंना उमेदवारी दिली होती. पण या मतदारसंघात अनिल देसाई यांनी मोठा विजय मिळवत राहुल शेवाळे यांना पराभूत केलं.
हे ही वाचा>> ठाकरेंच्या शिलेदाराचं टेन्शन वाढलं, चेंबूरची जागा कशी राखणार?
मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात आर. तमिळ सेल्वन यांचा धारावी हा मतदारसंघ येतो. याच मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार राहुल शेवाळे यांना 10,626 मतांची आघाडी मिळाली होती. म्हणजेच इथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावल्याचं चित्र आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ मविआसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
आर. तमिळ सेल्वन यांच्या सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळाली?
- अनिल देसाई (शिवसेना - UBT) - 49 हजार 114 मतं मिळाली
- राहुल शेवाळे (शिवसेना - शिंदे गट) - 59 हजार 740 मतं मिळाली
2019 विधानसभा निवडणुकीत सायन-कोळीवाडामध्ये कोणाला किती मतं मिळालेली?
2019 विधानसभा निवडणुकीत भाजपचे आर. तमिळ सेल्वन यांना सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात 54 हजार 845 मते मिळालेली. तर काँग्रेसच्या गणेश यादव यांना 40 हजार 894 मतं मिळाली होती. या मतदारसंघात मनसेचे उमेदवार अनंत कांबळे हे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना एकूण 13,684 मतं मिळालेली. याच मतदारसंघात वंचित हा पक्ष चौथ्या क्रमांकावर होता. त्यांचे उमेदवार आमीर इद्रीस यांना 11,556 मतं मिळालेली.
ADVERTISEMENT