'DGP रश्मी शुक्लांची तात्काळ बदली करा', अचानक कसे आले बदलीचे आदेश?

रोहित गोळे

04 Nov 2024 (अपडेटेड: 04 Nov 2024, 01:47 PM)

Transfer DGP Rashmi Shukla: राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात यावी असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र शासनाला दिले आहेत. पण अचानक हे आदेश का देण्यात आले? असा सवाल आता विचारण्यात येत आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश

point

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर रश्मी शुक्लांना मोठा धक्का

point

ऐन निवडणुकीदरम्यान आयोगाने दिलेल्या आदेशाने कोणाला बसणार धक्का?

DGP Rashmi Shukla: मुंबई: राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची उद्या (5 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजेपर्यंत तात्काळ बदली करण्याचे आदेश हे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी काही दिवसांपूर्वी रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली होती. पण तरीही निवडणूक आयोगाने त्यासंबंधी कोणतेही आदेश दिले नव्हते. मात्र, आता मतदानाला अवघे 16 दिवस बाकी राहिलेले असताना निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. (transfer dgp rashmi shukla immediately why the sudden order from the central election commission)

हे वाचलं का?

या आदेशानंतर आता तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पॅनलमधून नव्या पोलीस महासंचालकांची निवड केली जाणार आहे. मविआ सरकारच्या काळात रश्मी शुक्लांवर फोन टॅपिंगचे आरोप झाले होते. हे आरोप सातत्याने सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तातडीने बदली करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.

हे ही वाचा>> Nawab Malik : शिंदे-पवारांची चर्चा सुरू? विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार? मलिकांच्या वक्तव्यानं सस्पेन्स वाढला

दुसरीकडे संजय राऊत यांनीही रश्मी शुक्लांच्या बदलीची मागणी लावून धरली होती. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या  निर्देशानंतर शुक्लांची बदली करण्यात आली. 3 IPS अधिकाऱ्यांचं पॅनल तयार केलं जाणार आहे.

DGP रश्मी शुक्लांच्या बदलीमागचं नेमकं कारण काय?

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या जातात. त्यामुळेच त्यांना झुकतं माप दिल्याचा आरोप हा सात्त्याने विरोधकांकडून केला जात होता. 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागील 2-3 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी जो आरोप केला होता तो पोलीस खात्याच्या प्रतिमेला धक्का लावणारा होता. त्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने आता जलद गतीने ही कारवाई केली आहे. 

शरद पवार म्हणाले होते की, 'पोलिसांच्या वाहनांमधून पैशांची रसद पुरवली जात आहे. अशी रसद पुरवणं हे धोकादायक आहे.' असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला होता.

हे ही वाचा>> Manoj Jarange : 'ह्याला पाड आणि त्याला पाड ही आपली भूमिका...'; निवडणुकीबाबत जरांगेंची मोठी घोषणा!

या आरोपानंतर ज्यांच्यावर राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्या पोलीस महासंचालकांवरच एक प्रकारे हा आरोप होता. त्यानंतर झालेली ही कारवाई खूप मोठी कारवाई आहे.

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण काय? (Rashmi shukla Phone tapping case)

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांचा आरोप रश्मी शुक्लांवर करण्यात आलेला होता. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप रश्मी शुक्लांवर आहे. रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून गुप्तवार्ता विभागाने नेत्यांचे फोन टॅप केले. त्या नेत्यांचे फोन बनावट नावांनी टॅप करण्यात आल्याचा आरोप आहे.

नाना पटोले यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे त्यांचा फोन टॅप करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री रावसाहेब दानवेंचे स्वीय सहाय्यक आणि तत्कालीन भाजपचे खासदार संजय काकडे, इतर लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करण्यात आले होते.

या प्रकरणात २०१९ मध्ये रश्मी शुक्लाविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल झालेला होता. भारतीय टेलिग्राफ अधिनियम १८८५ कायद्यातील कलम २६ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पुणे पोलीस पुढील आठवड्यात क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल करणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ‘मुंबई Tak’ला ही माहिती दिली.

    follow whatsapp