Mumbaitak Baithak 2024 : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं? वर्षा गायकवाडांनी मांडली काँग्रेसची भूमिका

मुंबई तक

12 Aug 2024 (अपडेटेड: 12 Aug 2024, 12:55 PM)

Varsha Gaikwad Mumbaitak Baithak 2024 : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आधीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे, संसदेतही त्यांनी जातीय गणनेची मागणी केली होती.त्याचवेळी असं बोलण्यात आलं यांना जात नाही आहे. ज्याला जात नाही तो जातीच्या गोष्टी करतो. ही वक्तव्य अतिशय चुकीची असल्याचे देखील वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)  यांनी सांगितले आहे.

varsha gaikwad at mumbaitak baithak 2024 on maratha reservation manoj jarange patil maha vikas aghadi

लाडक्या बहिण योजनेवरून वर्षा गायकवाडांनी अजित पवारांना घेरलं

follow google news

बातम्या हायलाइट

point

मराठा आरक्षणावर काँग्रेसची भूमिका काय?

point

लाडकी बहीण योजनेवर वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

point

विधानसभेसाठी काँग्रेसची रणनीती काय?

Varsha Gaikwad Mumbaitak Baithak 2024 :''काँग्रेस पक्षाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. ओबीसी व्यतिरीक्त मराठा आरक्षण दिले पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई Tak बैठकीवर मांडली आहे.तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आधीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे, संसदेतही त्यांनी जातीय गणनेची मागणी केली होती.त्याचवेळी असं बोलण्यात आलं यांना जात नाही आहे. ज्याला जात नाही तो जातीच्या गोष्टी करतो. ही वक्तव्य अतिशय चुकीची असल्याचे देखील वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)  यांनी सांगितले आहे.(varsha gaikwad at mumbaitak baithak 2024 on maratha reservation manoj jarange patil maha vikas aghadi) 

हे वाचलं का?

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड मुंबई तक बैठकीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका केली. ''केंद्रामध्ये त्यांची सत्ता असताना त्यांनी त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे होते. पण दुदैवाने भिजतं घोंगड ठेवायचं आणि मतांचं राजकारण करायचं'', अशी टीका वर्षा गायकवाड यांनी भाजपवर केली. 

हे ही वाचा : Praful patel Mumbaitak Baithak: अजित पवार-शरद पवार एकत्र येणार? प्रफुल पटेल म्हणाले...

वर्षा गायकवाड यांनी लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांना घेरलं आहे. स्वत:च्या बहिणीसमोर उमेदवार उभं करणं, स्वत:च्या बहिणींना पाडणं ही तुमची लाडकी बहीण योजना आहे का? तसेच लोकसभा संपल्यानंतर यांना लाडकी बहीण योजना आठवली आहे, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी महायुतीवर केली आहे. 

विधानसभेत आंबेडकर आघाडीत येणार? 

प्रकाश आंबेडकरांना आम्ही सांगितलेल तुम्ही महाविकास आघाडीत आलं पाहिजे. जागांच्या बाबतीत आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो.  
वर्षा गायकवाड यांच्याकडे आंबेडकर नाव जरी नसलं तरी वर्षा गायकवाड ही आंबेडकरांची अनुयायी आहे ती आंबेडकरी विचारांवर चालते.त्यामुळे ज्यावेळी त्यांनी चार ठिकाणी पाठिंबा दिला त्यावेळी त्यांनी मला पाचवा पाठिंबा द्यायला हवा होता,अशी खंत वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.त्याचसोबत जर त्यांची लढाई मोदींविरोधात होती तर त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायला हवा होता, असे देखील वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं ही आमची पुर्वी देखील मागणी होती आणि आता देखील आहे, त्यामुळे आंबेडकरांनी विधानसभेत पाठींबा द्यावा,असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. 

हे ही वाचा : Mumbaitak Baithak 2024: अजित पवारांची राष्ट्रवादी का हरली? प्रफुल पटेलांनी सांगितली तीन कारणे

तिसरी आघाडी होणार? 

महाराष्ट्रात तिसरी आघाडी होणार अशी चर्चा सूरू आहे. यावर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, जर तिसरी आघाडी झाली तर सेक्युलर मतांचं विभाजन होणार आहे.त्यामुळे मतांच विभाजन करून तुम्हाला कुणाला सत्तेवर आणायचं आहे, असा सवाल करत त्यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. तिसरी आघाडी झाली तर महायुती फायदा होणार की नाही माहित नाही, पण जनता सूज्ञ आहे. त्यामुळे लोकसभेत महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा जिंकून आल्या.त्यामुळे जनतेने ठरवलं तर ती काही करू शकते, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. 

    follow whatsapp