Devendra Fadnavis Mumbai tak Baithak 2024: लोकसभेला इतका फटका का बसला? फडणवीस स्पष्टच बोलले

मुंबई तक

12 Aug 2024 (अपडेटेड: 12 Aug 2024, 02:51 PM)

Devendra Fadnavis Mumbai tak Baithak 2024 : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपामध्ये महायुतीमध्ये सर्वाधिक जागा कुणाला मिळणार? विधानसभा निवडणूक कुणाच्या नेतृत्वााली लढणार? फडणवीस यांची स्पष्ट उत्तरे...

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप, महायुतीला इतका फटका का बसला?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

follow google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीस यांची मुंबई Tak ला खास मुलाखत

point

महाविकास आघाडी फडणवीसांना का करतेय टार्गेट?

point

लोकसभा निवडणुकीला इतका फटका का बसला?

Devendra Fadnavis Maharashtra Assembly election 2024 : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या मुंबई Tak बैठक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारण, महाराष्ट्राबद्दलचे व्हिजन याबद्दल भूमिका मांडली. (Devendra Fadnavis Exclusive interview with Mumbai Tak)

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "लोकांना ज्या गोष्टी बोचत होत्या, त्या आम्ही नीट केल्या आहेत. विधानसभेत ज्या गोष्टी आव्हानात्मक वाटतात, त्या आम्ही नीट केल्या आहेत. त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेत आपण जिंकू आडाखे विरोधक बांधत असतील तर ते पूर्ण होणार नाही."

देवेंद्र फडणवीस यांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

"आमचे जे विरोधी पक्ष आहेत, त्यांच्याकडे ५० वर्षांचा अनुभव असलेले नेते आहे. त्यांना कळत की, महायुतीचे शक्तिस्थान काय आहे. त्यांना माहितीये की कुणाला टार्गेट केले पाहिजे. मी उद्धवजींवर टीका केली होता. त्यावेळी उबाठापेक्षाही जास्त मला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने टार्गेट केले. तीन पक्षात भाजपची ताकद जास्त आहे, हे त्यांना माहिती आहे", असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >> "...तर प्रकाश आंबेडकर आणि वंचितचे 4 जण खासदार झाले असते"

लोकसभा निवडणुकीत फटका का बसला?

"लोकसभेचे विश्लेषण केले, तर आमच्या १२ जागा अशा आहेत, जिथे वेगळा पॅटर्न दिसला. तो विधानसभेत दिसणार नाही. आमच्याकडे जी मते होती, त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची मते मिळून विशिष्ट जागा मिळवू असे वाटले होते. पण, दुसरीकडे नवीन पक्ष होते, त्यांची मते एकमेकांना गेली नाहीत."

हेही वाचा >> नेते पक्ष सोडतायत, तुम्ही राज ठाकरेंची साथ का सोडली नाही? बाळा नांदगावकर म्हणाले...

"अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मते जाणे, सगळ्यात कठीण होते. पण, आता ते विधानसभेला घडणार नाही. आम्ही जितकी मते शिवसेनेकडे ट्रॉन्स्फर करू शकलो, तितकी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे करू शकलो नाही", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    follow whatsapp