गेल्या वर्षांपासून नामशेष झालेला माळढोक पक्षी अखेर सोलापूर माळढोक अभयारण्यात परतला आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे. कधीकाळी मोठ्या संख्येने असणारे हे माळढोक पक्षी आता देशात फक्त शंभरते सव्वाशे तर राज्यात यांचा आकडा दहा सुद्धा उरला की नाही, असा प्रश्न आहे. या पक्षांच्या संवर्धनासाठी उत्तरसोलापूरचा मोठा क्षेत्र माळढोक अभयारण्यासाठी देण्यात आला आहे. मात्र ज्या पक्षिच्या नावाने हे अभयारण्य आहे, तोपक्षीच इथे फिरकत नव्हता. त्यामुळे वन्यजीव प्रेमींमधून चिंता व्यक्त केली जात होती.
ADVERTISEMENT
माळढोक पक्षी सोलापूरच्या अभयारण्यात दिसू लागला आहे
मागच्या काही दिवसांपासून सोलापूरच्या या अभयारण्यात हा माळढोक पक्षी दिसू लागला आहे. नामशेष होत चाललेलामाळढोक पक्षी नान्नज-गंगेवाडी अभयारण्यत मागील दोन दिवसांपासून दिसत आहे. साधारण 5 वर्षे वयाची मादीमाळढोक या अभयारण्यात आढळून आल्याने निसर्ग प्रेमींसाठी ही पर्वणी असणार आहे. मात्र वन्यजीव विभागाच्या गाईडशिवाय फिरण्यास आणि फोटो काढण्यास वनविभागाने मनाई केली आहे. वन विभागाकडून घालण्यात आलेल्यानिर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापुरातील अभयारण्यात ठराविक कालावधीत दिसतात माळढोक
जुलै ते ऑक्टोबर दरम्यान माळढोक पक्ष्याच्या मादीचा नियमित वावर असतो, असं वन्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्यासर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे गवत चांगले वाढले आहे.त्यावरील किडे, नाकतोडे, उंदिर खाण्यासाठी माळढोक पक्षीअभयारण्यात दरवर्षी परत येतो. त्याला पाहण्यासाठी पर्यटक माळढोक पक्षी अभयारण्यकडे धाव घेत आहेत. मात्र, त्यांनापरवानगी शिवाय फोटो काढता येणार नाही आणि गाईडशिवाय फिरता येणार नाही.
देशात केवळ 150 माळढोक पक्षी
देशभरात माळढोक पक्ष्यांची संख्या 100 ते 150 पर्यंत आहे. राजस्थानमध्ये सर्वाधिक संख्या आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकामध्ये या हे पक्षी आढळतात. महाराष्ट्रात अमरावती, नाशिक व सोलापूर जिल्ह्यात माळढोकचा वावरआहे. सोलापूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये मागील काही वर्षांमध्ये माळढोक आढळला नाही. सोलापुरातील माळरानावरमाळढोक काही महिन्यांसाठी स्थलांतरित होतो. दरवर्षी ठरावीक कालावधीत माळढोक पक्षी या अभयारण्यत आढळूनयेतो.
असे कमी होत गेले माळढोक
स्वतंत्र पूर्वकाळात मोठ्या संख्येत असलेले माळढोक ब्रिटिश आणि स्थानिक शिकाऱ्याचे बळी होत गेले. माळरानावरफिरून या पक्षांची शिकार होऊ लागली आणि माळढोकची संख्या हळूहळू कमी होत गेली. माळढोक वर्षातून एकदा एकचअंडे देतो तेही उघड्यावरच. त्यामुळे शिकारी पक्षी, भटकी कुत्री, घोरपड हे प्राणी खातात. त्यामुळे माळढोक पक्षीवाढण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
मागील दोन दिवसांपासून अभयारण्यातील संरक्षित क्षेत्रामध्ये माळढोक पक्षी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना गस्तघालताना दिसला. या आठवड्यात माळढोक परत आल्याचा अंदाज वन्यजीव कर्मचान्यांनी व्यक्त केला होता. दोनदिवसांपूर्वी अभयारण्यातील रस्ता ओलांडून माळढोकची मादी गवतावरील किड्यावर ताव मारत फिरत असतानाचेव्हिडीओ चित्रीकरण वन्यजीव कर्मचाऱ्यांनी केले. माळढो. पक्षी वाढावे आणि त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी वनविभागाकडून प्रयत्न व्हावेत, अशी आशा वन्य प्रेमीकडून व्यक्त केली जातेय.
ADVERTISEMENT